ऑनलाईन लॉटरी व्यवसायात सहभाग असणारे नगरसेवक अमोल शिंदे यांच्यावरही गुन्हा नोंद
सोलापूर – येथे ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार व्यवसाय करणार्या ‘खेलो जीतो’, ‘फेअरडिल’ आणि ‘साई लकी कुपन’ या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर सोलापूर गुन्हे शाखेने धाड टाकली. यामध्ये २७ संगणक, १३ भ्रमणभाष आणि ७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेचे नगरसेवक अमोल शिंदे यांचाही या लॉटरी व्यवसायात सहभाग असल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. (शहरात अजून किती ठिकाणी असे व्यवसाय चालू आहेत, हे शोधून पोलिसांनी तत्काळ कारवाई करायला हवी, ही अपेक्षा ! – संपादक) शहरात २ ठिकाणी ऑनलाईन जुगार चालू होता. १९ मार्चच्या रात्री गुन्हे शाखेेने धाड टाकून आरोपींना कह्यात घेतले आहे.