मुंबई-पुणे येथून १८ सहस्र नागरिक लातूर येथील गावांमध्ये परतले
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; मात्र मुंबई-पुणे येथून येणार्या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; मात्र मुंबई-पुणे येथून येणार्या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मुंबई आणि पुणे येथून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणार्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने २२ सहस्रांहून अधिक नागरिकांची नोंदणी करून घेण्यात आली आहे….
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती स्थापन केली आहे.
जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. दिवसा ५, तर रात्री २ कर्मचारी आणि पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
शहरातून विनाकारण कुणीही दुचाकीवरून फिरतांना आढळल्यास संबंधितांची दुचाकी शासनाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे.
भाजीपाला घरपोच देण्याविषयीही विचार चालू
येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाने उत्पादकाचे नाव अन् परवाना क्रमांक नमूद नसलेल्या ‘सॅनिटायझर’च्या १०० बाटल्या जप्त केल्या आहेत.
येथील एम्.आय.एम्.चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समर्थकाने येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली आणि वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली.
जिल्ह्यात खासगी डॉक्टरांनी दवाखाने चालू ठेवणे बंधनकारक आहे, तसेच ‘अन्नधान्य आणि भाजीपाला यांचा साठा मुबलक असल्याने एकाच वेळी गर्दी करू नका’, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले….
सहारा येथील एका गोदामामध्ये साठा करून ठेवण्यात आलेली मास्कची २०० खोकी पोलिसांनी पकडली आहेत. सहारा आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही एकत्रितपणे कारवाई केली…..