अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या युवकाला अटक

अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका युवकाला निवती पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सुवर्णा श्रीकांत जाधवर (वय ४८ वर्षे) यांचे १५ नोव्हेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, १ मुलगा, २ मुली, असा परिवार आहे. सनातन परिवार जाधवर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

मालवण येथे जलक्रीडा व्यावसायिकांवर बंदर विभागाची कारवाई

१८ नोव्हेंबरला बंदर विभागाच्या पथकाने ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी राज्यशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगत अवैधपणे व्यवसाय करणार्‍या ‘जलक्रीडा’ व्यावसायिकांवर कारवाई केली. या वेळी संतप्त व्यावसायिकांनी ‘कारवाई न थांबवल्यास समुद्रातच उपोषण करू’, अशी चेतावणी दिली

कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात उपचारास अनुमती

शहरी नक्षलवादी यांची प्रकृती बिघडल्याने १५ दिवस उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात भरती

हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला कृषी महाविद्यालयात चाकरी

ऐन भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेश यांची बहिण कल्याणी यांना त्यांच्या भावाच्या पार्थिवाला ओवाळावे लागले.

सिंधुदुर्गात १३ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू 

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ९० झाली आहे.

मंदिरांनंतर आता गड, किल्ले यांची दारे उघडली

दुर्ग आणि किल्ले सर्वांसाठी खुले.

बोलेरो वाहनाच्या चोरीप्रकरणी धर्मांधाला पोलीस कोठडी

वाहनाची चोरी केल्याप्रकरणी संशयित हबीब रहिमतुल्ला गडकरी याला ७ दिवसांची पोलीस कोठडी

सुरूर (जिल्हा सातारा) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी रोखली गोवंशियांच्या मांसाची तस्करी : दोघांना अटक

गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोवंशियांच्या मांसाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणे हे प्रशासनाचे अपयशच होय. गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना कठोर शिक्षा न केल्याचेच हे फलित आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

वाढीव वीजदेयकामध्ये दिलासा मिळणार नाही ! – ऊर्जामंत्री नितीन राऊत

वीज ग्राहकांना वाढीव वीजदेयकातून दिलासा देण्यास सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. ‘मीटर रिडिंग’प्रमाणे आलेली देयके ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.