नवी मुंबई विमानतळासाठी धोकादायक असणार्‍या दर्ग्यावर कारवाई करावी !

अनधिकृत दर्गा राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांना दिसतो, तर सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ? हे संबंधित यंत्रणेचे अपयश म्हणायचे कि अकार्यक्षमता ?

गोवंडी (मुंबई) येथे एकाच घरात आढळले ४ मृतदेह !

गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरातील एकाच घरात ४ जणांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये शकील खान, रजिया या पती-पत्नी यांसह २ अल्पवयीन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटिसा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ जुलै या दिवशी नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा अन् सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या आहेत.

अंधेरी येथे चित्रपटाच्या सेटला आग !

अंधेरी पश्चिम भागातील चित्रकूट मैदान येथे उभारलेल्या चित्रपटाच्या सेटला २९ जुलै या दिवशी भीषण आग लागली. अग्नीशमनदलाच्या १० गाड्यांनी आग विझवली.  सेटचे काम चालू असल्याने अनेक कामगार आत अडकल्याचा अंदाज आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेने मागितले मार्गदर्शन !

पीओपीची मूर्ती विरघळण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट नागरिकांना विनामूल्य दिले जात होते; मात्र ‘या वर्षी ते खरेदी करणार नाही’, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय !

शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी महापालिका ३ वर्षांची वैज्ञानिक मासिकाची वर्गणी भरणार आहे.

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पुणे येथे पोलीस ठाण्यावर ३०० हून अधिक रहिवाशांचा मोर्चा !

पुण्यात टोळीयुद्ध आणि हाणामारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था शेष नसल्याचे दिसते. ही परिस्थिती पालटण्यासाठी पोलीस स्वत:चा धाक केव्हा निर्माण करणार ?

पुणे येथील बोगस शिक्षकभरती घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी होणार

आकुर्डी येथील एका शिक्षणसंस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ शिक्षकांची भरती काही शिक्षणाधिकार्‍यांच्या संगनमताने झाल्याचे चौकशीत उघडकीस झाले होते.

(म्हणे) ‘कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी तुम्ही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही !’ – अभिनेत्री विद्या बालन

जराही सामाजिक भान नसलेल्या कलाकारांची पात्रता आता जनतेनेच दाखवून द्यावी. यासह अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना स्वाभिमानी बाणाही दाखवून दिला पाहिजे !

हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेकांकडून टीका

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ‘हिंदु देवतांना शिव्या देणार्‍या अंधारेबाईंना समवेत घेऊन हिंदुत्वाची लढाई लढणार का ?’, ‘विनाशकाले विपरितबुद्धी’ यालाच म्हणतात’, अशी टीका करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी केली आहे.