(म्हणे) ‘कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी तुम्ही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही !’ – अभिनेत्री विद्या बालन

अभिनेता रणवीर सिंह याने स्वत:चे नग्न छायाचित्रे प्रसारित करण्याला अभिनेत्री विद्या बालन यांच्याचे समर्थन !

अभिनेत्री विद्या बालन

मुंबई – ‘रणवीर सिंह याच्या (नग्न) छायाचित्रांमुळे कुणी दुखावले गेले असेल, तर त्यांनी ते पाहू नका. त्याविषयी वाचू नका; परंतु त्याने काय करावे ? आणि काय करू नये ? हे लोकांनी सांगू नये ! तुम्ही कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही’, अशा शब्दांत अभिनेत्री विद्या बालन यांनी नग्न छायाचित्र प्रसारित करणारा अभिनेता रणवीर सिंह याच्या स्वैराचाराचे समर्थन केले.

बालन पुढे म्हणाल्या, ‘‘आपण सर्व भिन्न माणसे आहोत. समोरची व्यक्ती काय करत आहे, हे तुम्हाला आवडत नसेल, तर डोळे बंद करा. रणवीर याने तसे कपडे घालण्यात काय अडचण आहे ? त्याच्यावर टीका करणे अतिशय चुकीचे आहे.’’ रणवीर सिंह यांनी अमेरिकेतील ‘पेपर’ नावाच्या मासिकासाठी स्वत:चे नग्न छायाचित्र दिले आहे. या प्रकरणी रणवीर सिंह यांच्या विरोधात चेंबूर येथील एक सामाजिक संस्था आणि ठाणे येथील अधिवक्त्या वेदिका चौबे यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

संपादकीय भूमिका

जराही सामाजिक भान नसलेल्या कलाकारांची पात्रता आता जनतेनेच दाखवून द्यावी. यासह अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना स्वाभिमानी बाणाही दाखवून दिला पाहिजे !