हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेकांकडून टीका

सुषमा अंधारे

मुंबई – हिंदूंच्या देवतांवर टीका करणार्‍या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ‘हिंदु देवतांना शिव्या देणार्‍या अंधारेबाईंना समवेत घेऊन हिंदुत्वाची लढाई लढणार का ?’, ‘विनाशकाले विपरितबुद्धी’ यालाच म्हणतात’, अशी टीका करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी केली आहे. ‘सुषमा अंधारे शिवसेनेत आल्याने ‘उजेड’ पडेल का ?’ अशी टीकाही काही माध्यमांतून होत आहे.

सुषमा अंधारे यांनी यापूर्वी केलेली हिंदुद्वेषी विधाने

यापूर्वी सुषमा अंधारे यांनी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर अश्‍लाघ्य टीका केली आहे. ‘जेव्हा धर्माला ग्लानी येथे, तेव्हा श्रीकृष्ण अवतार घेतो’, असे त्याने सांगितले होते. आता महिलांवर एवढे एवढे प्रचंड अत्याचार होत आहेत, हत्या होत आहेत; परंतु अजून काही तो येत नाही. कुठल्यातरी गोपीसमवेत ‘डेट’वर (एकमेकांना पारखण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया एकमेकांच्या घेत असलेल्या भेटी) गेला असावा’, तसेच ‘ईश्‍वर सगळीकडे आहे’, हे हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान सगळ्या हिंदूंना आणि भाजप, शिवसेना यांनाही मान्य असेल, तर ‘राम अयोध्येतच जन्मला’ हा वाद कशासाठी घालता ?’ यांसारखी अनेक हिंदुद्वेषी विधाने त्यांच्या यापूर्वी प्रसारित झालेल्या काही व्डिडिओमध्ये त्यांनी केली आहेत.