देहलीत ८७ वर्षांच्या महिलेवर बलात्कार !

देहलीत आता वृद्ध महिलाही असुरक्षित ! यावरून समाजाची मानसिकता किती पराकोटीची रसातळाला गेली आहे, हेच सिद्ध होते ! जोपर्यंत बलात्कार्‍यांना तात्काळ फाशी दिली जात नाही, तोपर्यंत असे घृणास्पद प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?

देहलीच्या पोलीस कोठडीतील आरोपी फैजल याने पोलिसाची पिस्तूल खेचून पोलिसांवरच केला गोळीबार

भुरटे धर्मांध चोरही पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस करतात, यावरून अशांनाही फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !

आयुर्वेदामुळे मुलीचा दृष्टीदोष जाऊन तिला नीट दिसू लागल्याने केनियाच्या माजी पंतप्रधानांनी मानले भारताचे आभार !

भारतात आयुर्वेदाला नावे ठेवणार्‍यांना चपराक ! विदेशी लोकांनी आयुर्वेदाचे गुणगाण गायल्यावर भारतातील लोकांना त्याचे महत्त्व समजेल !

भारत सरकारकडून ५४ चिनी ‘अ‍ॅप्स’वर बंदी !

हे ‘अ‍ॅप्स’ वर्ष २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या चिनी अ‍ॅप्सचे नामांतर केलेले किंवा दुसर्‍या ‘ब्रँड’च्या नावाखाली नव्याने प्रकाशित केलेले आहेत.

एकदाच वापरायच्या प्लास्टिकवर १ जुलै २०२२ पासून बंदी !

यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर यांच्याशी संबंधित सर्व संस्थांना नोटीस पाठवली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णन् यांना ३ कोटी रुपयांचा दंड !

मनमानी कारभार केल्याच्या प्रकरणी, तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटींमुळे ‘सेबी’ने केली कारवाई !

‘एबीजी शिपयार्ड’ या आस्थापनाकडून २८ बँकांची २२ सहस्र ८४२ कोटी रुपयांची फसवणूक

यापूर्वी अनेकांनी बँकांना लाखो कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना  घडल्यानंतरही सरकारी यंत्रणा यातून काही शिकत का नाहीत ? अशा घोटाळ्यांना उत्तरदायी असलेल्यांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

अरबी समुद्रात पाकमधून आलेल्या नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.

(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल  हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.