देहलीत आता वृद्ध महिलाही असुरक्षित ! यावरून समाजाची मानसिकता किती पराकोटीची रसातळाला गेली आहे, हेच सिद्ध होते ! जोपर्यंत बलात्कार्यांना तात्काळ फाशी दिली जात नाही, तोपर्यंत असे घृणास्पद प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?

नवी देहली – पश्चिम देहलीतील टिळकनगर येथे अज्ञात व्यक्तीने एका ८७ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून अन्वेषण चालू केले आहे. पीडित महिलेसह तिची ६५ वर्षीय मुलगी रहाते. १३ फेब्रुवारीला दुपारी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्या वेळी पीडित वृद्ध महिला एकटीच घरी होती.
An 87-year-old woman was allegedly raped in the national capital's Tilak Nagar area, police said.#Delhi #Crime https://t.co/nUZUqJ07bA
— TIMES NOW (@TimesNow) February 14, 2022
त्यांची मुलगी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा त्या व्यक्तीने वृद्ध महिलेवर बलात्कार केला. मुलगी घरी परतली तेव्हा आईचे कपडे फाटल्याचे आणि तिला रक्तस्राव होत असल्याचे तिच्या लक्षात आले, असे पीडित महिलेच्या मुलीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने घरातून एक भ्रमणभाष संचही पळवल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
पीडित वृद्ध महिलेला समुपदेशन आणि सर्व आवश्यक साहाय्य पुरवले जात आहे, असे देहली पोलिसांनी सांगितले.
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !