बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
कालपर्यंत असाच आरोप भारतावर केला जात होता आणि आता तो इस्रायली यंत्रणांवर केला जात आहे. असे आरोप करण्यापेक्षा पाकने बलुची लोकांवरील अत्याचार थांबले पाहिजेत !
कालपर्यंत असाच आरोप भारतावर केला जात होता आणि आता तो इस्रायली यंत्रणांवर केला जात आहे. असे आरोप करण्यापेक्षा पाकने बलुची लोकांवरील अत्याचार थांबले पाहिजेत !
बलुचिस्तान प्रांतात एका पोलीस चौकीवर करण्यात आलेल्या आक्रमणात ९ पोलीस ठार झाले, तर ५ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. हे आक्रमण झियारत जिल्ह्यातील मांगी डॅम (धरण) परिसरात असलेल्या पोलीस चौकीवर करण्यात आले.
स्फोट झाल्यानंतर लगेचच त्यांच्या ‘फतेह स्क्वाड’च्या लढवय्यांनी केंद्रावर चहुबाजूंनी आक्रमण केले आणि जिवंत राहिलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांशी चकमक केली.
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा, अशी जाणीव बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानला करून दिली.
बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांच्याच्या उल्लंघनाविरुद्ध सातत्याने आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
स्फोट इतका जोरदार होता की, रेल्वेगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरले. पोलिसांनी सांगितले की, स्फोटाच्या प्रभावाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर वेढला आहे. पुढील अन्वेषण केले जात आहे.
पाकिस्तानी सैन्यदलाने बलुचिस्तानमध्ये एक गुप्त मोहीम राबवली आहे. या कारवाईत बलुचिस्तानमधील ३५ स्वातंत्र्यसैनिकांना ठार मारले असून ३ वरिष्ठ कमांडरना अटक करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेच्या लढवय्यांनी पाकिस्तानी सुरक्षादलांना लक्ष्य करून बाँबस्फोट करणे, दबा धरणे, धाडी घालणे आणि ड्रोन यांद्वारे ही आक्रमणे केली.
कारगिल युद्धाच्या वेळीही पाकने ठार झालेल्या पाक सैनिकांचे मृतदेह घेण्यास नकार दिला होता. असा पाकिस्तान स्वतःच्या जिवंत सैनिकांना तरी कसा स्वीकारेल ?
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) पाकिस्तानी सैन्याच्या ७ सैनिकांना पकडून ओलीस ठेवले आहे. याचा व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे.