बलुच लिबरेशन आर्मीचा दावा
क्वेटा (बलुचिस्तान) – बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे की, त्यांनी १५ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत पाकिस्तानी सुरक्षादलांवर २७ आक्रमणे केली. या आक्रमणांत ४२ पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी मारले गेले, अनेक जण घायाळ झाले, तर एका सैनिकाला बंदी बनवण्यात आले. संघटनेने पाकिस्तानी सुरक्षादलांच्या अनेक चौक्यांवर नियंत्रण मिळवल्याचा आणि पाकिस्तानी सुरक्षादलांची शस्त्रे लुटल्याचाही दावा केला आहे.
संघटनेचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेच्या लढवय्यांनी पाकिस्तानी सुरक्षादलांना लक्ष्य करून बाँबस्फोट करणे, दबा धरणे, धाडी घालणे आणि ड्रोन यांद्वारे ही आक्रमणे केली.

Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !