पकडण्यात आलेल्या सैनिकांनी व्हिडिओ प्रसारित करून पाक सैन्यावर केली टीका

क्वेटा (बलुचिस्तान) – बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बी.एल्.ए.ने) ७ पाकिस्तानी सैनिकांना पकडले असले, तरी पकडण्यात आलेले लोक पाकचे सैनिक नसल्याचा दावा पाक सैन्याने केला आहे. पाकिस्तानी सैन्याने कोणताही सैनिक बेपत्ता नसल्याचा आणि कुणालाही पकडण्यात आलेले नाही, असा दावा केला. यानंतर पकडलेल्या सैनिकांचे व्हिडिओ बी.एल्.ए.ने प्रसारित केले आहेत. यात २ पाकिस्तानी सैनिक रडतांना दिसतात. ‘पाक सैन्याने आम्हाला येथे पाठवले; परंतु आता सैन्य आम्हाला ओळखण्यास नकार देत आहे’, असे ते सांगतांना दिसतात. त्यांनी त्यांची पाक सैन्याने दिलेली ओळखपत्रेही दाखवली आहेत.
Pakistan Army refuses to recognize soldiers captured by the Baloch Liberation Army.
In Kargil too, it denied its own fallen.
If it wouldn’t accept its dead, will it accept its living?
BLA demands release of Baloch prisoners in 7 days in exchange. ⏳#Balochistan #PakistanArmy… https://t.co/QHqxchyW5x pic.twitter.com/wDZo5llPLy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 20, 2026
बंदीवानांच्या सुटकेची केली आहे मागणी !
बी.एल्.ए.ने अलीकडील कारवायांद्वारे २० पेक्षा अधिक व्यक्तींना कह्यात घेतल्याचा दावा केला होता. त्यांपैकी काही जणांची सुटका करण्यात आल्याचे सांगितले. बी.एल्.ए.ने पाक सैनिकांच्या सुटकेच्या बदल्यात बलूच बंदीवानांच्या सुटकची मागणी केली आहे. यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास त्यांच्या बलूच नॅशनल कोर्टद्वारे सैनिकांना शिक्षा दिली जाईल, अशी चेतावणीही देण्यात आली आहे. बलोच लिबरेशन आर्मी बलूचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र मानते आणि त्याची स्वतःची राज्यघटना आणि कायदे असून त्याद्वारे कारभार केला जात आहे.
संपादकीय भूमिकाकारगिल युद्धाच्या वेळीही पाकने ठार झालेल्या पाक सैनिकांचे मृतदेह घेण्यास नकार दिला होता. असा पाकिस्तान स्वतःच्या जिवंत सैनिकांना तरी कसा स्वीकारेल ? |
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी