Balochistan : बलुचिस्तानमध्ये पोलीस चौकीवरील आक्रमणात ९ पोलीस ठार, तर ५ जण बेपत्ता

पाकच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत १५ आतंकवादी ठार झाल्याचा दावा

क्वेटा (बलुचिस्तान) – बलुचिस्तान प्रांतात एका पोलीस चौकीवर करण्यात आलेल्या आक्रमणात ९ पोलीस ठार झाले, तर ५ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. हे आक्रमण झियारत जिल्ह्यातील मांगी डॅम (धरण) परिसरात असलेल्या पोलीस चौकीवर करण्यात आले. या आक्रमणानंतर पाकच्या सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेचे १५ आतंकवाद्यांना ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की, आम्ही कुणालाही बलुचिस्तानमधील शांतता भंग करू देणार नाही. शांततेच्या शत्रूंचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत आमचा त्यांच्या विरुद्धचा लढा चालूच राहील.