Baloch Liberation Army Attack : बलुचिस्तान प्रांतात ‘बलुच लिबरेशन आर्मी’ कडून आत्मघाती आक्रमणात  पाकिस्तानचे ३० सैनिक ठार !


ग्वादर (बलुचिस्तान) – बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानपासून पूर्णपणे स्वतंत्र करण्यासाठी लढा देणार्‍या ‘बलुच लिबरेशन आर्मी’ (बी.एल्.ए.) या बलुचिस्तानच्या सशस्त्र फुटीरतावादी संघटनेने ग्वादर जिल्ह्यातील जिवानी भागात पाकिस्तानच्या ‘कोस्ट गार्ड्स’च्या केंद्रावर आत्मघाती आक्रमण केले. आत्मघाती आक्रमणकर्त्याने स्फोटकांनी भरलेला ट्रक केंद्रात घुसवला. यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला. या आक्रमणात ३० हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले आहेत.

‘बी.एल्.ए.’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ३ जुलै या दिवशी त्यांच्या विशेष ‘मजीद ब्रिगेड’ने हे आक्रमण घडवून आणले. स्फोट झाल्यानंतर लगेचच त्यांच्या ‘फतेह स्क्वाड’च्या लढवय्यांनी केंद्रावर चहुबाजूंनी आक्रमण केले आणि जिवंत राहिलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांशी चकमक केली. अनेक जण ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असेही या संघटनेने म्हटले आहे.