बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट !
नागरिकांकडून रस्त्यावर उतरून निषेध !

क्वेटा (बलुचिस्तान) – बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांच्याच्या उल्लंघनाविरुद्ध सातत्याने आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महरंग बलोच या व्यवसायाने डॉक्टर आहेत. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथील आतंकवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश महंमद अली मोबीन यांनी २२ जून या दिवशी ही शिक्षा घोषित केली. या निर्णयाच्या विरोधात बलुचिस्तानमध्ये तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. महरंग बलोच यांना ‘बलुचिस्तानची वाघीण’ म्हटले जाते. न्यायालयाच्या या निर्णयाचा मानवाधिकार संघटना, विरोधक आणि इतर संस्था यांनी निषेध केला आहे. या निर्णयानंतर आता बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.
१. महरंग बलोच यांची निर्भीड कार्यशैली पाकिस्तानी राजवटीसाठी धोका मानली जाते. त्या ‘बलूच यकजेहती कमिटी’च्या (‘बी.व्हाय.सी.’च्या) प्रमुखही आहेत. या संघटनेच्या आंदोलनाच्या वेळी वर्ष २०२४ मध्ये ग्वादर येथे एका सुरक्षा अधिकार्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूसाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणी ‘बी.व्हाय.सी.’चे सदस्य सिबगतुल्ला बलूच आणि बलोच कादिर खान यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२. ‘बी.व्हाय.सी.’ ने जनआंदोलनाच्या माध्यमातून या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या