क्वेटा (बलुचिस्तान) – शहरातील रेल्वे रुळाजवळ २४ मे या दिवशी आत्मघाती आक्रमण झाले. यात तेथून जात असलेली ‘जाफर एक्सप्रेस’ सापडली. या आक्रमणात ३० लोकांचा मृत्यू झाला, तर ८२ जण घायाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील चमन फाटकाजवळ हा स्फोट झाला.
स्फोट इतका जोरदार होता की, रेल्वेगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरले. पोलिसांनी सांगितले की, स्फोटाच्या प्रभावाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर वेढला आहे. पुढील अन्वेषण केले जात आहे.

Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !