सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी पिऊ नये !

चूल पेट घेत असतांना तिच्यात तांब्याभर पाणी ओतले, तर काय स्थिती होईल ? सकाळी उठल्याउठल्या भरपूर पाणी प्यायल्याने जठराग्नीच्या (पचनशक्तीच्या) संदर्भात असेच होत असते. त्यामुळे सकाळी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’

पूर्व किंवा दक्षिण या दिशांना डोके करून झोपावे ! (चार दिशांना डोके करून झोपल्यास होणारे परिणाम)

‘पूर्वेकडे डोके करून झोपल्यास धन, तर दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य प्राप्त होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता वाढते, तर उत्तरेकडे डोके करून झोपल्यास हानी किंवा मृत्यू ओढवतो.

ग्रहणकाळात उपवास करण्याने होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ

उपवास केल्यास सुस्ती येत नाही, म्हणजे तमोगुण वाढत नाही. उलट सत्त्वगुण वाढतो. ग्रहणकाळात उपवास केल्याने जो सत्त्वगुण वाढतो, त्याच्यामुळे ग्रहणकाळातील साधना चांगली होते.

इतरांची झोपमोड होणार नाही, याची काळजी घ्या !

‘एखादा माणूस झोपलेला असेल, तर त्याची झोपमोड होऊ देऊ नये.’ अनेकांना याचे भान नसते. दुसरा झोपलेला असतांना मोठ्याने बोलणे, पिशवीचा किंवा अन्य आवाज करणे, तसेच झोपलेल्याला जाग येईल, अशी कोणतीही कृती करणे टाळावे.’

सूर्याेदयापूर्वी उठावे !

सूर्येणाभ्युदितो यश्च त्यक्तः सूर्येण वा स्वपन् ।
अन्यत्रातुरभावात्तु प्रायश्चित्ती भवेन्नरः ।।
अर्थ : जो मनुष्य सूर्याेदय किंवा सूर्यास्त या वेळी झोपून रहातो, त्याने प्रायश्चित्त घ्यायला हवे. रुग्णाईत मनुष्य याला अपवाद आहे.’

फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?

फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात. ज्यांना हे येत नाही, त्यांनी ओळखीच्या सुगरणींकडून ते शिकून घेतले, तर घरातील पित्ताचे त्रास पुष्कळ न्यून होतील.          

केवळ ‘आयुर्वेदातील औषधे खाणे’ म्हणजे आयुर्वेदानुसार आचरण नव्हे !

स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते.

आधुनिक वैज्ञानिकांनी सांगितलेली देशी गायीच्या दुधाची बहुउपयोगिता !

‘गाय मानवी जीवनासाठी अत्यंत हितकारी आहे. शास्त्रांमध्ये गायीला ‘माता’ म्हटले गेले आहे. गायीच्या दुधाची बहुउपयोगिता आता वैज्ञानिकांनीही विविध प्रयोगांद्वारे सिद्ध केली आहे.

लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे

घसा लाल होणे, घसा दुखणे, घसा खवखवणे, तसेच सर्दी, खोकला व ताप किंवा कणकण या लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे.