निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !

आपले आरोग्य ‘आपण आपला दिवस कसा घालवतो’ यावर अवलंबून असते. आयुष्यातील प्रत्येक दिवस निरोगी झाल्यास सर्व आयुष्यच आरोग्यसंपन्न आणि आनंदी होते. म्हणूनच आरोग्यरक्षण हा संयमी जीवनाचा पाया आहे !

जलनेती

एका नाकपुडीतून पाणी घालून दुसरीतून बाहेर काढणे याला ‘जलनेती’ म्‍हणतात. नेतीसाठी किंचित कोमट पाणी मीठ घालून वापरावे. नेतीचे एक विशिष्‍ट प्रकारचे भांडे (नेती पॉट) असते. त्‍यामुळे नाकपुडीत पाणी घालणे सोपे जाते. वाटी किंवा भांडे यांनीही नाकात पाणी घालू शकतो. आरंभी जलनेती करतांना थोडा त्रास होतो. नंतर सवयीने त्रास होत नाही.

बस्‍ती चिकित्‍सा !

पावसाळ्‍यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढते. हवामानातील रुक्षता वाढल्‍याने वाताचे प्राबल्‍य वाढते. अशा परिस्‍थितीत शरिरामध्‍येही वातदोष वाढायला लागतो. पावसाळ्‍यात वातदोष आणि त्‍यामुळे निर्माण होणारे विविध रोग वाढू नयेत म्‍हणून आपण पुढील गोष्‍टी करू शकतो

उत्‍साही आणि निरोगी आयुष्‍याचा मूलमंत्र : योगासने !

योगसाधनेमुळे सकारात्‍मकता येऊन मनुष्‍याचा जीवनाकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोनही सुधारतो. ही व्‍यायामपद्धती संपूर्ण भारतीय आहे. आपल्‍या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपासून ही पद्धत शोधून काढली आणि स्‍वीकारली होती. त्‍यामुळे ते दीर्घकाळ स्‍वस्‍थ आणि निरोगी जीवन जगू शकत होते. 

शरिराप्रमाणे मनाचेही लसीकरण करा !

नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्‍यमय अन् यशस्‍वी जीवन जगण्‍याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्‍याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्‍याने आपल्‍या मनाचे आरोग्‍य चांगले रहाते.

एकाच खांद्यावर वजन किंवा पिशवी घेणे टाळावे !

शरिराच्या संरचनेत पालट झाल्यास त्याचा कटी (कंबर), गुडघा, टाच इत्यादी सांध्यांवर ताण येऊन त्यांचे दुखणे चालू होते. असे होऊ नये, यासाठी एकाच खांद्यावर वजन न घेता आलटून पालटून दोन्ही खांद्यावर थोडा थोडा वेळ वजन घ्यावे.’

पावसाळा चालू होण्यापूर्वी औषधी वनस्पतींच्या लागवडीची सिद्धता करा !

वनस्पतींचे औषधी उपयोग आणि लागवडीविषयी माहिती सनातनचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ आणि ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यांत दिली आहे. या ग्रंथांचा अभ्यास करावा.

तीव्र उन्हामुळे येणार्‍या थकव्यावर सरबत उपयुक्त

‘उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे पुष्कळ घाम येतो. शरिरातील पाणी आणि क्षार न्यून झाल्याने थकवा येतो. अशा वेळी लिंबू सरबत किंवा अन्य कोणतेही सरबत प्यावे. याने पाणी आणि क्षार यांची पूर्तता होऊन लगेच तरतरी येऊन आराम वाटतो.

अती मात्रेत जेवणे किंवा अती आग्रह करून वाढणे टाळावे !

अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. आजकाल लग्नसमारंभांचे दिवस असल्याने आवडीचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे घडू शकते. आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.

पाकिटबंद अन्न, ते अन्न नव्हेच…!

ज्याचे विज्ञापन करावे लागते, ते अन्न नाही. पोळी, भात, भाकरी, वरण, तूप, भाज्या, कोशिंबीर आणि विविध उसळी यांचे विज्ञापन करावे लागते का हो ? निसर्गातून प्राप्त झालेले आणि सहस्रो वर्षांपासून मनुष्यप्राणी जे ग्रहण करतो, ते हे खरे अन्न !