पावसाळा चालू होण्यापूर्वी औषधी वनस्पतींच्या लागवडीची सिद्धता करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९७

‘आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही प्रत्येकाच्या घरात थोड्या तरी औषधी वनस्पती असणे आवश्यक आहे. तुळस, अडूळसा, कोरफड, ब्राह्मी, कालमेघ (किरायते), पानफुटी यांसारख्या औषधी वनस्पती घराच्या सज्जातही (गॅलरीतही) लावता येतात. नेहमीच्या विकारांमध्ये या औषधी वनस्पतींचा पुष्कळ उपयोग होतो. या वनस्पतींचे औषधी उपयोग आणि लागवडीविषयी माहिती सनातनचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ आणि ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यांत दिली आहे. या ग्रंथांचा अभ्यास करावा. पावसाळा चालू झाल्यावर लागवडीची सिद्धता करणे कठीण जाते. त्यामुळे आताच औषधी वनस्पतींच्या लागवडीची सिद्धता करावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan