काँग्रेस आणि साम्यवादी यांचे पाठीराखे कथित इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्याकडून उमर खालिदसारख्या धर्मांधाची पाठराखण का ?

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा विद्यार्थी देशद्रोही उमर खालिदचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने जळफळाट झालेला साम्यवादी-उदारमतवादी (डावा-लिबरल) कंपूने आणि कथित इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी उमर खालिदच्या ‘पीएच्.डी. थिसिस’वर (विद्यावाचस्पति होण्याच्या प्रबंधावर) स्तुतीसुमने उधळली. याचे वर्णन ‘एका इतिहासकाराकडून दुसर्‍या इतिहासकारासाठी’, या शब्दांत केले जात आहे.

१. खालिदने प्रबंध चांगला लिहिला; म्हणून द्रेशद्रोही कारवाया झाकणार कशा ?

पहिले म्हणजे उमर खालिद हा इतिहासकार कधी झाला ? म्हणजे ‘गरीब हेडमास्तराचा (मुख्याध्यापकाचा) मुलगा’ इथपर्यंत ठीक आहे; पण इतिहासकार ? बरे ते सोडा. त्याचा ‘थिसिस’ गुहांच्या म्हणण्याप्रमाणे ‘फार भारी होता’, हे घटकाभर खरे मानले, तरी त्यामुळे त्याच्या देशद्रोही कारवाया झाकल्या जात नाहीत. त्याला त्यासाठी कारागृहात टाकले आहे. वाईट ‘थिसिस’ लिहिला; म्हणून कारागृहात टाकलेले नाही आणि तिसरे महत्त्वाचे, म्हणजे स्वतः गुहांची ‘इतिहासकार’ म्हणून काय पात्रता होती की, त्यांनी इतरांना ‘सर्टिफिकेट’ (प्रमाणपत्र) वाटत फिरावे ?

श्री. अभिजित जोग

२. जवाहरलाल नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान

गुहा महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काय तारे तोडले होते, हे पाहिले, तर त्यांची लायकी लगेच लक्षात येते.  खरेतर स्वतंत्र भारताचे प्रतीक असायला हवे होते, छत्रपती शिवाजी महाराज; पण काँग्रेस-साम्यवादी (कम्युनिस्ट) ‘इकोसिस्टम’ने (यंत्रणेने) छत्रपती शिवाजी महाराज यांचा नेहमीच तिरस्कार केला. स्वतः नेहरूंनी महाराजांचे वर्णन ‘वाट चुकलेला देशभक्त’ अशा अवमानकारक शब्दांत केले होते.

३. कथित इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी असलेला विखार आणि त्याचे खंडण

काँग्रेसचे लाडके दरबारी इतिहासकार असलेल्या रामचंद्र गुहा यांच्या मनात महाराजांविषयी किती विखार होता, हे बघूया. देहलीत बाबर, हुमायू, जहांगीर, शाहजहा, खिलजी, औरंगजेब या धर्मांध आणि अत्याचारी आक्रमकांच्या नावाने रस्ते अन् स्मारके यांची रेलचेल असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव एखाद्या रस्त्यालाही का दिले जाऊ नये ? अशी आग्रही मागणी करण्यात आल्यावर छत्रपतींचा अपमानास्पद एकेरी उल्लेख करत हे गुहा महाशय म्हणतात, ‘देहलीतील रस्त्याला शिवाजीसारख्या व्यक्तीचे नाव देण्याची कल्पना का चुकीची आहे ?’,

याची ३ कारणे आहेत :

अ. ‘बहुसंख्यवादाला खतपाणी जाईल’, असे म्हटले जाणे : पहिले कारण, म्हणजे ‘असे केल्याने बहुसंख्यवादाला खतपाणी घातले जाईल.’ यामागे आहे, काँग्रेस-साम्यवादी लॉबीची ‘सेक्युलॅरिझम’ची (निधर्मीपणाची) विकृत व्याख्या, जिच्या मते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी अत्याचारी आणि बलात्कारी आक्रमकांचा उदो उदो करणे आवश्यक आहे; पण त्यांचा प्रतिकार करणार्‍या हिंदु राजाचे नाव मात्र ‘सेक्युलॅरिझम’ जपण्यासाठी इतिहासातून पुसले गेले पाहिजे !

आ. छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रादेशिक पातळीवरील व्यक्तीमत्त्व म्हणणे : रामचंद्र गुहांच्या मते ‘भारताच्या राजधानीत शिवाजीसारख्याचा सन्मान केला जाऊ नये’, याचे दुसरे कारण, म्हणजे ‘शिवाजी हे एक प्रादेशिक पातळीवरील व्यक्तीमत्त्व होते. ‘मराठ्यांचा अभिमान’ याला प्रादेशिक संदर्भात काही अर्थ आहे; पण भारतासारख्या मोठ्या वैविध्यपूर्ण देशाच्या राजधानीत त्याला काहीही स्थान असता कामा नये.’ ‘ज्या मराठा साम्राज्याने जवळपास संपूर्ण देशावर स्वतःचा अंमल (प्रभाव) प्रस्थापित केला, देहलीतील मोगल बादशाहला मांडलिक बनवले आणि अटकेपार झेंडे फडकवले, त्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक प्रादेशिक व्यक्तीमत्त्व होते’, असे म्हणणार्‍या गुहांना इतिहासकार मानले गेले’, यावरून काँग्रेस राजवटीत इतिहास लेखनाचा दर्जा किती खालावला होता, याची कल्पना येते.

इ. छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सरंजामशाहीतील राजा’ म्हणणे : गुहांनी दिलेले तिसरे कारण तर केवळ धक्कादायक आहे. ते म्हणतात, ‘नवी देहलीतील रस्त्याला शिवाजीचे नाव देणे आपण का टाळले पाहिजे, याचे तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण, म्हणजे तो सरंजामशाहीच्या काळातील राजा होता, जो जातीवर आधारित उच्च-नीचतेचा समर्थक होता आणि ज्याने महिलांना दुय्यम स्थान देणार्‍या धर्मग्रंथांना अन् सामाजिक चालीरितींना बळ दिले.’

६ जानेवारी या दिवशी ‘जे.एन्.यू.’ विद्यापिठातआंदोलन करतांना साम्यवादी विद्यार्थी

या बरळण्यावरून हे स्पष्ट दिसते की, ज्यांना अपकीर्त करून त्यांचे अस्तित्व पुसून टाकायचे आहे, अशा ऐतिहासिक व्यक्तीमत्त्वांविषयी बोलतांना साम्यवादी जी शेलकी विशेषणे वापरतात, त्यांचाच उल्लेख गुहाने कुठलाही अभ्यास न करता आणि माहिती न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केला आहे. या मूर्ख माणसाला हे ठाऊक नाही की, मध्ययुगीन सरंजामशाहीचा भाग असलेल्या वतनदारी व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक सुधारणा आणि पालट करून सामान्य शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. ‘जनतेकडून कर वसूल करतांना कुठलीही जुलूम-बळजोरी करू नये’, असा आदेश छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला होता. आपल्या महसूल अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, ‘रयतेवर काडीचे जाल व गैर केलियास साहेब तुजवर राजी नाहीत, असे बरे समजणे.’ (प्रजेवर थोडाही अन्याय वा जुलूम केल्यास राजांची खप्पा मर्जी होईल, हे पक्के ध्यानात ठेवावे.) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शेती उत्पन्नावर केवळ २५ टक्के कर घेतला जात असे. याउलट मुसलमान सुलतानांच्या राजवटीत ५० टक्के, ६६ टक्के, तर काही वेळी ७५ टक्के इतका प्रचंड कर शेतकर्‍यांकडून जुलूम बळजोरी करून वसूल केला जात असे. हा कर देण्यासाठी पैसे नाहीत; म्हणून सहस्रो शेतकरी अंगावरच्या वस्त्रानिशी जंगलात पळून जात. या लोकांमधून पुढे वाटसरूंना लुटणार्‍या ठग-पेंढार्‍यांच्या टोळ्या सिद्ध झाल्या.

अशा जुलुमी सुलतानांचे कौतुक करणारे गुहा छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सरंजामशहा’ ठरवतात, यावरून त्यांचा ढोंगीपणा आणि घोर अज्ञान दिसून येते.

खोटारडे रामचंद्र गुहा यांना खरेतर टकमक टोकावरून ढकलून द्यायला हवे; पण…

खिलजी, तुघलक यांच्यासारख्या वखवखलेल्या श्वापदांची नावे देहलीतील रस्त्यांना दिलेली आहेत. ती गुहांना ‘गंगा-जमनी तहजबी’ची (हिंदु-मुसलमानांमध्ये कथित सलोखा राखण्याविषयी) प्रतीके वाटतात; पण ‘आयाबहिणींच्या अब्रूचे रक्षण करणे’, हे ज्यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेमागचे एक प्रमुख उद्दिष्ट होते, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव मात्र देहलीतील रस्त्याला द्यायचे नाही, का तर ते महिलांना दुय्यम स्थान देणार्‍या चालीरितींचे समर्थक होते ! अशा या अडाणी, ढोंगी आणि खोटारड्या रामचंद्र गुहा यांना खरेतर टकमक टोकावरून ढकलून द्यायला हवे; पण काँग्रेस सरकारने वर्ष २००९ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतका द्वेष आणि तिरस्कार काँग्रेस-साम्यवादी युतीने केला.

– श्री. अभिजित जोग

४. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जातीवरून आणि महिलांना दुय्यम वागणूक दिले जाण्यावरून केली जाणारी टीका अन् खंडण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात १८ पगड जातींचा समावेश होता. सैन्यात अथवा प्रशासनात नेमणुका करतांना त्यांनी कधीही जातीभेद केला नाही. याउलट मुसलमान राजवटींमध्ये महत्त्वाच्या जागी भारतीय मुसलमानांची कधीही नेमणूक होत नसे. या जागा परदेशी वंशाच्या अश्रफ मुसलमानांसाठी राखीव असत. असे असतांनाही ‘छत्रपती शिवाजी महाराज जातीवर आधारित उच्च-नीचतेचे समर्थक होते’, असे बिनदिक्कतपणे ठोकून देणार्‍या गुहा यांना इतिहासकार म्हणणे यासारखी विटंबना दुसरी कुठलीही नसेल. ‘छत्रपती शिवाजी महाराज महिलांना दुय्यम स्थान देत होते’, हे प्रतिपादन तर कमालीचे संतापजनक आहे. स्वराज्याची प्रेरणा त्यांना मिळाली ती त्यांच्या आईसाहेबांकडून. स्वतःच्या  ‘मोहिमांच्या कालावधीत स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जाऊ नये, अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल’, अशा सूचना त्यांनी त्यांच्या सैन्याला दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कडवा टीकाकार काफीखान म्हणतो, ‘स्वतःच्या लष्करी मोहिमांमध्ये स्त्रियांच्या सन्मानाला कुठल्याही प्रकारे धक्का लावला जाऊ नये, असा नियमच शिवाजीने केला होता.’

याउलट इस्लामी राजवटींमध्ये सहस्रो स्त्रियांवर बलात्कार केले गेले. त्यांना अफगाणिस्तान आणि इराण येथील बाजारात गुलाम म्हणून विकले. गझनीच्या बाजारात एका मनोर्‍याखाली गुलामांचा बाजार भरत असे. तिथे ‘दुख्तरे हिंदुस्तान नीलामे दो दिनार’ (हिंदुस्थानच्या लेकींचा लिलाव दोन दिनारमध्ये), अशा घोषणा दिल्या जात. मोरोक्कोचा प्रवासी इब्न बतूता महंमद तुघलकाच्या दरबारात साजर्‍या होणार्‍या ईदचे वर्णन करतांना लिहितो, ‘सर्वप्रथम गेल्या वर्षभरात पकडलेल्या काफिर राजकन्या नृत्य करतात. त्यानंतर त्यांना अमीर-उमराव, तसेच परदेशी पाहुण्यांमध्ये वाटले जाते. यानंतर इतर काफिरांच्या मुली नृत्य करतात… सुलतान त्यांना त्याच्या नातेवाइकांमध्ये वाटतो.’

असे रामचंद्र गुहा आणि त्यांचे अडाणी काँग्रेसी, साम्यवादी भाईबंद उमर खालिदसारख्या धर्मांध आतंकवाद्याची पाठराखण करतात यात काय आश्चर्य ?

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.

संपादकीय भूमिका : इतिहासाचे विकृतीकरण करून वैचारिक प्रदूषण करणारे साम्यवादी इतिहासकार हे वैचारिक आतंकवादी असून ते जिहादी आतंकवाद्यांइतकेच धोकादायक !