
मुसलमान कट्टरतावाद्यांकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविषयी पत्रकारांनी विचारलेले तिखट प्रश्न अनेकांना झोंबतात. ते कोण ? स्वतःला ‘सुधारणावादी’ म्हणणारे, अधोगामीत्वाच्या दिशेने जाणारे पुरोगामी, समाजाला नको ती वळणे लावू पहाणारे विचारवंत, हिंदूंविषयी विषमभाव असलेले समानतावादी…. ते अप्रत्यक्ष शहरी नक्षली आणि अजूनही….. ही सूची बरीच लांब आहे. ‘इनजस्टिस’, ‘डिस्क्रिमिनेशन’, ‘हेट स्पीच’, ‘हेट क्राइम’, ‘चाइल्ड राइट्स’, ‘मायनॉरिटी राइट्स’ वगैरे वगैरे यांसारख्या अफलातून ‘सॉफ्ट’ शब्दांच्या आडून ‘हेट’ पसरवणारे चेहरे आता सर्वांना कळून चुकले आहेत. एखाद्याला काही वेळासाठी वेड्यात काढता येत असले, तरी सर्वांना सर्वकाळ वेड्यात काढता येत नाही. त्यामुळे कितीही मृदुतेने अंथरलेले असले, तरी द्वेषाचे काटेरी जाळे आता काही केल्या लपणार नाही.
स्मृतीभ्रंशावर उपाय काय ?
मुंबईतील पत्रकार परिषदेत मानवतेच्या बचावकारांना राष्ट्रप्रेमी पत्रकारांनी प्रश्न काय विचारले, मानवतेच्या रक्षकांचे पित्तच खवळले. परिषद घेणारे एक जण तर पत्रकाराच्या अंगावर धावून आले आणि स्वकृतीतून द्वेषाची प्रत्यक्ष प्रचीती देणार्यांनी ल्यालेला मानवतेचा मुलामा तिथल्या तिथे उडाला. जामियानगर, देहली येथील मुसलमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असलेल्या ‘असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स’ आणि ‘क्विल फाऊंडेशन’ नामक संस्थांनी मिळून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या संस्थांच्या प्राथमिक ओळखीवरूनच त्यांच्या अहवालाचा निष्कर्ष कळतो. ‘७ जून २०२४ ते ७ जून २०२५ या काळात ६०२ द्वेषपूर्ण गुन्हे आणि द्वेषपूर्ण भाषणांच्या ३४५ घटना घडल्या. ४१९ घटनांमध्ये मुसलमान हे प्रामुख्याने बळी पडले, १ सहस्र ४६० जणांना याचा फटका बसला. ८५ आक्रमणांमध्ये १ सहस्र ५०४ ख्रिस्ती बळी पडले. किमान २५ मुसलमान मारले गेले आणि १७३ घटनांमध्ये शारीरिक हिंसाचाराचा समावेश होता’, अशी माहिती या संस्थांच्या अहवालात देण्यात आली आहे. मानवता आणि देश यांसाठी काम करणार्या या संस्था हिंदूंना विसरल्याचे दिसते. त्यांना ती माहिती हवी असेल, तर त्यांनी ‘सनातन प्रभात’ वाचावे. हिंदूंवरील विविध प्रकारच्या आक्रमणांच्या १५ ते २० घटना प्रतिदिन ‘सनातन प्रभात’ देते. गणित केल्यास हिंदूंवर आक्रमणाच्या महिन्याला २४० आणि वर्षाला २ सहस्र ८८० घटना केवळ पुढे आलेल्या घटना आहेत. पुढे न आलेल्या घटनांची तर गणतीच करता येणार नाही.

मुंबईच्या पत्रकार परिषदेत मोठ्या तोर्याने ‘हेटस्पीच’ करणार्या सर्वांवरच कारवाई व्हायला हवी’, असे सांगणार्यांच्या अहवालात ‘हिंदूवर आक्रमण’ हा शब्दही नव्हता. अनेक वर्षे ‘पुढे जात आहोत’, या विचाराने उलटी पावले चाललेल्यांचे वय अथवा कार्याची वर्षे पहाता त्यांना ‘हिंदूवरील आक्रमणां’विषयी स्मृतीभ्रंश झालेला असू शकतो; पण त्यांना हे आठवते की, २२ एप्रिल या दिवशी पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर १८० द्वेषपूर्ण आक्रमणे झाली. ज्यांतील ३७ टक्के आक्रमणे मुसलमान, नव्हे अल्पसंख्य मुसलमान यांच्याविरुद्ध ‘बदला’ म्हणून करण्यात आली. ‘पहलगाम घटनेतील आक्रमणकर्ते मुसलमान होते आणि त्यांनी हिंदूंना धर्म विचारून त्यांची हत्या केली’, हे मात्र ते विसरले. स्मृतीभ्रंशच म्हणा तो… त्याला आणखी काय म्हणणार ?
| ‘हेटस्पीच’ करणार्या सर्वांवरच कारवाई व्हायला हवी’, असे सांगणार्यांचा हा अहवाल !
|
‘अलीकडच्या दशकांमध्ये ओळख आधारित (म्हणजे ‘चुन चुन के’ म्हणतात, त्या) आक्रमणांमध्ये नाटकीय वाढ झाली आहे. (जी प्रत्यक्ष धर्मांधांनी केली आहेत) त्यामुळे पीडितांच्या मनात सतत भीती निर्माण होते. याने त्यांचे जीवन जगणे आणि स्वातंत्र्य या अधिकारांचे उल्लंघन होत आहे. आक्रमणांमुळे पीडित झालेले उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड या भाजपशासित राज्यांमध्ये अधिक आहेत’, अशीही माहिती या संस्था देतात. भारताच्या नकाशातील बंगाल, कर्नाटक, केरळ, जम्मू-काश्मीर, परवाच ‘मॉबलिंचिंग’मध्ये जेथे हिंदू बळी पडले, ते राजस्थान ही राज्येही त्यांच्या विस्मृतीत गेली. हाही स्मृतीभ्रंशाचा परिणाम ! ‘स्मृतीभ्रंश’ या आजारावर औषध उपलब्ध नाही; परंतु त्याची गती संतुलित आहार, व्यायाम, मानसिक-सामाजिकदृष्ट्या सक्रीयता यांमुळे न्यून करता येऊ शकते, असे म्हणतात. त्यामुळे वरीलप्रमाणे स्मृतीभ्रंश झालेल्यांना शुद्ध शाकाहारी संतुलित आहार, व्यायाम अन् सामाजिक-मानसिक सक्रीयतेसाठी वातानुकूलित खोल्यांच्या बाहेर असलेल्या बंगालमधील हिंदु वस्त्यांमध्ये फिरवून आणणे लाभदायी ठरू शकते. अर्थात् ते तसे करणार नाहीत. त्यामुळे आता हिंदूंनीही शिशुपालाचे शंभर अपराध भरू द्यावेत.
‘अल्पसंख्यांक’, ‘अल्पसंख्यांक’ म्हणत अमाप पैसा आणि सत्ता यांसाठी चाललेले पुरो(अधो)गाम्यांचे ‘बहु’प्रयत्न आता शेवटच्या टप्प्यावर आले आहेत. काहीही करून ‘आम्ही किती गरीब-सौम्य’ हे दाखवण्याच्या नादात ‘काटेरी’ चेहर्यांची हिंसक वागणूक वारंवार पुढे येत आहे. समानता, मानवता यांसाठी आयुष्यभर कुरापती करणार्यांनी या शब्दांची जी हेटाळणी केली आहे, ते शब्द पुढे सहस्रो वर्षे ‘शिवी’ म्हणून वापरली जाण्याला आजचे हेच सौम्य काटेरी चेहरे कारणीभूत ठरणार आहेत.

विझण्यापूर्वीची फडफड
सामाजिक कार्य करणारे साम्यवादी, समाजवादी, (अंध)श्रद्धा निमूर्लक, पर्यावरणवादी, मानवाधिकारवाले, शहरी नक्षलवादी-माओवादी, फुटीरतावादी, खलिस्तानवादी, ‘डीप स्टेट’चे प्यादे, धर्मांध मुसलमान आणि धर्मांध ख्रिस्ती, हे सगळे एकाच माळेतील मणी ! एकाला ‘अरे’ केले की, दुसरा बरोबर ‘का रे’ वर येतोच येतो. ‘धादांत खोटेपणा पसरवणे’ हा त्यांचा आवडता धंदा आणि संधीसाधू ही त्यांची वृत्ती, हे सर्व ठिकाणी सारखेच आढळते. भेद आहे, तो केवळ प्रांताचा ! महाराष्ट्रात त्यांना (अंध)श्रद्धा निमूर्लक म्हणतात, पंजाबात खलिस्तानवादी, सणावारी ‘पर्यावरणवादी’ अशी त्यांची नावे असतात. त्यांच्याच संस्था, त्यांचे सर्वेक्षण, त्यांचेच अहवाल आणि त्यांचेच पीडित असल्यामुळे ते सर्व विश्वासार्ह असतील, याची ग्वाही नाही. प्रत्यक्ष सामना करता येत नसल्याने ऑनलाईन ‘युद्ध’ खेळून आणि पत्रकार परिषदा घेऊन विझण्यापूर्वीची फडफड करण्याचा प्रयत्न या सर्वांकडून चालू आहे. त्यातही निरुत्तर झाल्यावर पलायनवादाचे हे म्होरके ! त्यांनी कितीही सौम्यपणाचा आव आणला, तरी सर्वांनाच कायम वेड्यात कसे काढता येईल ? खोट्या तक्रारी करून पोलीस आणि प्रशासन, तसेच पत्रकार परिषदा घेऊन पत्रकार यांचा वेळ वाया घालवणार्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, त्यांच्या एकमेकांतील कड्या शोधून काढून सर्वांनाच काय ते एकदाचे देशप्रेमाचे आणि सामाजिक सौहार्दतेचे काढे पाजावेत, हीच सहिष्णु हिंदूंची अपेक्षा !
| भारतात ‘मानवते’साठी काम करणार्या ‘समाज’वाद्यांना हिंदूंवरील आक्रमणे दिसू नयेत, हा त्यांच्या स्मृतीभ्रंशाचा पुरावा ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !