हिंदूंनी दर्शवला विरोध !

तुमकुरू (कर्नाटक) – शहरातील के.आर्. लेआऊट भागामधील श्रीराममंदिराजवळ असलेल्या सरकारी शाळेच्या जागेवर अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा प्रस्ताव त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी शहर आमदार जी.बी. ज्योतीगणेश यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष एच्.एस्. रविशंकर, जिल्हा सरचिटणीस टी.एच्. हनुमंतराजू, भाजप शहराध्यक्ष टी.के. धनुष आदींचा समावेश होता.

🚨 Proposal to build a Minority Hostel next to the Shri Ram Temple in Tumakuru, Karnataka sparks outrage.
A delegation led by MLA @Mlajyothiganesh has demanded immediate cancellation of the proposal, warning that it could hurt Hindu religious sentiments and disturb law & order.… pic.twitter.com/KCRuANsLoR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2026
आमदार ज्योतीगणेश म्हणाले की,
१. हा विषय अत्यंत संवेदनशील असून यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येण्याची शक्यता आहे. हे हिंदूंच्या धार्मिक भावनांशी संबंधित असल्याने सार्वजनिक शांतता, सलोखा आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून तातडीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी डॉ. एन्. तिप्पेश्वामी यांची भेट घेऊन केली.
२. श्रीराममंदिराशी संबंधित संपूर्ण जागेचे अधिकृत सर्वेक्षण, हद्द निश्चिती आणि मोजणीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. धर्मादाय विभागाचे दस्तऐवज आणि राजपत्रात नमूद केलेली जागा मंदिराची मालमत्ता म्हणून संरक्षित करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्या भागात अल्पसंख्यांकांच्या वसतीगृहासह कोणत्याही नवीन बांधकामाचा प्रस्ताव असल्यास तो त्वरित रहित करण्यात यावा. मंदिराशी संबंधित जागा केवळ हिंदूंचे धार्मिक विधी, तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठीच मर्यादित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात