Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !

  • पुणे शहरात पुन्हा ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण

  • आस्थापनेचा व्यवस्थापक महंमद उपाख्य जाफर सय्यद यास अटक !

पुणे – औंध येथील एका ‘स्टार युनियन दाई इची लाईफ इन्शुरन्स कंपनी’ या प्रसिद्ध ‘विमा आस्थापने’त काम करणार्‍या हिंदु तरुणीचा विनयभंग, तिच्याशी अश्लील संभाषण आणि तिचा छळ केल्याचे उघड झाले. या प्रकरणी मुसलमान व्यवस्थापक महंमद उपाख्य जाफर सय्यद याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून या क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.

१. आरोपी जाफर हा उच्चपदस्थ असून तो शाखेचा व्यवस्थापक आहे. पीडित तरुणीला कामाव्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठी तो भ्रमणभाष करत होता.

२. आरोपी हा पीडितेशी बोलतांना अत्यंत अश्लील भाषेत आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे संभाषण करून तिचा मानसिक छळ करत होता.

३. एका दिवशी कामाच्या निमित्ताने तो तिला लोणावळ्याला घेऊन गेला. तिथे त्याने तरुणीशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला.

४. वरिष्ठ अधिकार्‍याच्या या विकृत वागणुकीला कंटाळून पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.

संपादकीय भूमिका

‘कॉर्पोरेट जिहाद’ची प्रकरणे एका पाठोपाठ एक उघड होत आहेत. यावरून या प्रकरणांची भयावहता लक्षात घेऊन सरकार राज्यातील सर्व कॉर्पाेरेट आस्थापनांची पडताळणी का करत नाही ?