३० सहस्र रुपयांचा माल जप्त !

नागपूर – भंडारा शहरात अन्न आणि औषध प्रशासनाने गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे आणि दिशाभूल करणारे विज्ञापन प्रसिद्ध करून नियमांचे उल्लंघन करणार्या २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २९ सहस्र ७९२ रुपये किमतीचा आक्षेपार्ह औषध साठा जप्त करण्यात आला. औषध निरीक्षक आणि साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, भंडारा यांच्या पथकाने ३ जून या दिवशी शहरातील २ वेगवेगळ्या ठिकाणी अचानक भेट देऊन पडताळणी केली.
मे. श्री लक्ष्मी आयुर्वेद औषधालय (राममंदिर रोड, बडा बाजार, भंडारा) आणि पतंजली चिकित्सालय आणि औषधी भंडार स्टोअर्स (मे. अविशा इंटरप्राईजेस) (राजीव गांधी चौक, भंडारा) या २ प्रतिष्ठानांवर धाड घालण्यात आली. पडताळणीच्या वेळी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण १५ औषधांवर आक्षेपार्ह माहिती आणि विज्ञापन आढळून आले.
पहिल्या प्रतिष्ठानातून १२ सहस्र १८० रुपयांचा, तर दुसर्या (पतंजली) प्रतिष्ठानातून १७ सहस्र ५१२ रुपयांचा औषध साठा कायदेशीर पंचनामा करून जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या औषधांच्या वेष्टनावर मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, नेत्ररोग, गलगंड, महिला आणि पुरुषांमधील लैंगिक समस्या अन् वजन अल्प करणे यांसारख्या गंभीर आजारांवर त्वरित गुण येईल, अशी माहिती छापण्यात आली होती.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव