उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मुंबई, २ जुलै (वार्ता.) – आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अत्यंत पवित्र भाग आहे. अनेक शतके ही वारी अखंडितपणे चालू आहे. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. वारीमध्ये अनेक साम्यवादी, पुरोगामी विचारांचे, देवाला न मानणार्या अंनिसचा सहभाग संशयास्पद आहे. त्यामुळे याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित त्यावर स्वाक्षरी करत ‘संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून उचित कार्यवाही करावी’, असा आदेश दिला.
राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांचीही हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी समितीच्या वतीने त्यांनाही या विषयाचे निवेदन देण्यात आले. यावर मंत्री कदम यांनी ‘राज्याचे पोलीस महासंचालक आणि विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्याशी बोलतो’, असे आश्वासन समितीला दिले.
शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उठवला आवाज !
पंढरपूरच्या वारीत शिरकाव केलेल्या अर्बन नक्षलींवर कारवाई करण्यात यावी.
डॉ. मनीषा कायंदे
आमदार, शिवसेना#Shivsena #Eknathshinde pic.twitter.com/lFmUkj37sV— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 2, 2025
देव न मानणार्या लोकांनी वारीत शिरून भाविकांचा बुद्धीभेद करणे, तसेच त्यांना देवापासून दूर नेणे, हे हिंदु धर्मावरील आक्रमण आहे. काही शहरी नक्षलवादी वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने वारीत शिरले आहेत. सरकारने याची गंभीर नोंद घ्यावी आणि वारीत शिरलेल्या शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केली.
Urban Naxals Infiltrating Wari? 🛑
Shiv Sena MLA @KayandeDr raises an alarm in the Maharashtra Legislative Council! 🗣️
"Those who don’t believe in God are entering the sacred Wari procession to mislead devotees; this is an attack on Hindu Dharma!" 🕉️😡
👥 Disguised as NGOs,… pic.twitter.com/Z0OPgOHnqe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 2, 2025
२ जुलै या दिवशी माहितीच्या सूत्राच्या (‘पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन’च्या) अंतर्गत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी याविषयीची माहिती विधान परिषदेत दिली. या वेळी डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘‘आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. पंढरीची वारी जगप्रसिद्ध आहे.
वारकऱ्यांच्या वारीचा दैवी दिनक्रम! | वारीत पुरोगाम्यांची घुसखोरी कशी रोखाल? | दादा महाराज शिरवाळकर
गोरगरीब वारकरी या भक्ती मेळाव्यातून पंढरपूरला जातात; परंतु काही शहरी नक्षलवादी ‘संविधान वारी’, ‘पर्यावरण दिंडी’, ‘लोकायत’ आदी नावाने वारीत घुसले आहेत. वारीत पथनाट्ये करून, तसेच भाषणे करून हे लोक भाविकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. वारीत घुसलेल्या या शहरी नक्षलवाद्यांना सरकारने अटकाव करावा.

संतवीर ह.भ.प. बंड्यातात्या कराडकर यांनीही वारीत शिरलेल्या नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी या अधिवेशनात सरकार ‘जनसुरक्षा विधेयक’ आणणार आहे. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घ्यावी.’’
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वारीमध्ये शहरी नक्षलवाद शिरणे, हा अत्यंत गंभीर विषय असून गृहविभागाला कारवाई करण्याची सूचना देईन’, असे आश्वासन दिले.
वारकऱ्यांचा बुद्धीभेद करणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त करणे आवश्यकच ! – ह.भ.प. बापूसाहेब उखळीकर
| हे ही वाचा → |
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन करण्यास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध : रासायनिक लेपनामुळे मूर्तीची हानी !
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन