|

नवी देहली : ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ (त्याच्या ‘इतिहासा’ची कथा) नावाचा चित्रपट ३० मे या दिवशी प्रदर्शित झाला असून त्यातून स्वतंत्र भारतात इतिहासाचे कशा प्रकारे विकृतीकरण केले गेले यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट पदार्थविज्ञान शिकवणारे नीरज अत्री या प्राध्यापकाच्या सत्य कथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या छोट्या विज्ञापनात सांगण्यात आले आहे की, इतिहास जादूगार आहे. आपल्यावर अशा प्रकारचा इतिहास थोपवला गेला, जो मुळात तसा घडलाच नव्हता. उदा. वास्को-दा-गामाने भारताचा शोध लावला; अहिंसेद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळाले; ब्राह्मण बाहेरून भारतात आले; महिला आणि शूद्र यांना वेदांचे पठण करण्याची अनुमती नव्हती आदी.
🎬 The Real Protagonist of the Film "His Story of Itihaas" – Neeraj Atri says:
💬 “The Film Is Not Being Given Enough Screens!”
Speaking to Sanatan Prabhat, Mr. Neeraj Atri said:
🛡️ “This film exposes the anti-Hindu agenda. Since it challenges the established ecosystem, many… pic.twitter.com/Tw6oPJapmK— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 1, 2025
चित्रपटाला अधिक प्रमाणात ‘स्क्रीन्स’ दिल्या जात नाही आहेत ! – नीरज अत्री![]() यासंदर्भात ‘सनातन प्रभात’शी बोलतांना श्री. अत्री म्हणाले की, हा चित्रपट हिंदुविरोधकांचा बुरखा फाडणारा आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात असल्याने अनेक चित्रपटगृह मालकांकडून या चित्रपटाला ‘स्क्रीन्स’ दिल्या जात नाहीत, असे लक्षात येत आहे. तरी याविषयी हिंदूंमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. चित्रपटाविषयी बोलतांना ते म्हणाले की, या चित्रपटातून तरुण पिढीला कशा प्रकारे हिंदुविरोधी बनवण्यासाठी ‘ब्रेनवॉश’ केले जात आहे, ते दाखवण्यात आले आहे. शाळेत इतिहासाच्या अभ्यासातून मुलांच्या धर्माप्रती नकारात्मक धारणा कशा बनतात, हे हिंदु पालकांना कळू शकणार आहे. त्यामुळे अधिकाधिक हिंदूंनी त्यांच्या मुलांसमवेत हा चित्रपट पाहिला पाहिजे, असे आवाहन श्री. अत्री यांनी ‘सनातन प्रभात’द्वारे हिंदूंना केले आहे. |
Too much fiction in this world
Too much bull shit in this world
Neeraj has been singularly waking Hindus up everyday
Watch his story!#HisStoryOfItihaas @5karma_films @AtriNeeraj https://t.co/58DmXzUYb8
— Kreately.in (@KreatelyMedia) May 31, 2025
चित्रपटातून नीरज अत्री यांना ते पदार्थविज्ञान शिकवत असतांना ‘भारतीय व्यवस्था (एन्.सी.ई.आर्.टी.) कशा प्रकारे विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवत आली आहे’, हे उमगल्याचे दाखवून व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी उभारलेला लढा, इतिहासाच्या पुस्तकांमधील माहिती कोणत्या आधारे देण्यात आली, यावर अत्री यांनी माहिती अधिकाराखाली कशा प्रकारे अर्ज केले आणि एकूणच त्यांचा संघर्ष यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अत्री यांची भूमिका अभिनेते सुबोध भावे यांनी केली असून मनप्रीत सिंह धामी हे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत, तर ‘पंचकर्मा फिल्म्स्’ने हा चित्रपट निर्मित केला आहे.
उद्यापासून #HisStoryOfItihaas हा आमचा हिंदी चित्रपट भारतभरात प्रदर्शित होत आहे.
एका सत्य घटनेवरून प्रेरित असलेला हा चित्रपट.
आवर्जून पहा. आवडला तर त्याच पूर्ण श्रेय ज्यांच्या कामावर चित्रपट बेतला आहे त्या "नीरज अत्री " यांचे
आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक मनप्रीत यांचे . pic.twitter.com/t0VOq3FDXi— Subodh Bhave सुबोध भावे (@subodhbhave09) May 29, 2025
| His Story Of Itihaas | Trailer | In cinemas on 30 May | Subodh Bhave, Yogendra Tiku, Ankur Vikal
(सौजन्य : Panchkarma Films) |
This is You sir….who inspired us to make a movie.🙏🙏🙏 https://t.co/96iPM2T39b
— Subodh Bhave सुबोध भावे (@subodhbhave09) June 1, 2025
संपादकीय भूमिकाशालेय पाठ्यपुस्तकांतून भारतीय इतिहासाचे केले गेलेले विकृतीकरण हे स्वतंत्र भारतातील हिंदुविरोधी वैचारिक आतंकवादाचे सर्वांत मोठे षड्यंत्र आहे. याचा पर्दाफाश करणारा हा चित्रपट पहाणे आणि आपल्या मुलांनाही तो दाखवणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्म नि राष्ट्र कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या ! |

हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
Popular Front Of India : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त