कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !

गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्या जिल्ह्यातील घटना !

कारागृहातून पसार झालेले बंदीवान

कलबुर्गी (कर्नाटक) – कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्या कलबुर्गी जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहातून ३ बंदीवान पळून गेले. मस्तान, संतोष आणि सागर अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही बिदरमधील एका हत्येच्या खटल्यात शिक्षा भोगत होते. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कारागृहाची भिंत ओलांडून हे तिघे पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. (रा.स्व. संघावर टीका करण्यात वेळ घालवणार्‍या कर्नाटकाच्या गृहममंत्र्यांनी राज्यातील सोडा किमान स्वत:च्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष दिले असते, तर बंदीवान पळून जाण्याइतपत सुरक्षाव्यवस्था बिकट झाली नसती ! – संपादक) या प्रकरणी फराहताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

यापूर्वी ३ जुलै या दिवशी कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर पोलीस ठाण्यातील कोठडीतून ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असलेला आरोपी पळून गेला होता.

संपादकीय भूमिका

हे काँग्रेस सरकार त्याचे पोलीस यांना लज्जास्पद !