श्री. आशिष धर हे एक ‘मेकॅनिकल इंजिनीयर’ (अभियांत्रिकी अभियंता) आणि सामाजिक उद्योजक आहेत. (सामाजिक उद्योजक केवळ लाभासाठी कार्य करत नाहीत, तर समाजात परिवर्तन घडवणे, हा त्यांचा मुख्य उद्देश असतो) श्री. आशिष धर यांनी भारतीय ज्ञानपरंपरेतील गुलामगिरीचे चिन्हे पुसण्यासाठी आणि हिंदु संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी समर्पित अनेक व्यासपिठांना आकार दिला आहे.

अभियांत्रिकी शिक्षणापासून प्रारंभ करून त्यांनी नंतर ‘अपवर्ड फाऊंडेशन’ची सह-स्थापना केली आणि ते ‘इंडिक कलेक्टिव्ह ट्रस्ट’चे मुख्य सदस्यही आहेत. एक प्रभावी वक्ता आणि लेखक म्हणून ते त्यांच्या संशोधनपर ज्ञानाचा आणि काश्मिरी पंडित म्हणून मिळालेल्या जीवनानुभवाचा वापर करून प्रचलित वसाहतवादी अन् आधुनिक कथानकांना (नॅरेटिव्हज्) सामना करण्यासाठी, तसेच हिंदुत्वाची खरी ओळख जगासमोर येण्यासाठी कार्य करत आहेत.
विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. शिक्षण
श्री. आशिष धर यांनी सामाजिक कार्याकडे वळण्यापूर्वी ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून ‘मेकॅनिकल इंजिनीयरिंग’मध्ये ‘बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी’ (तंत्रज्ञानविषयक स्नातक) ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांची तांत्रिक शैक्षणिक पार्श्वभूमी, विश्लेषण करण्याची हातोटी आणि प्रकल्प व्यवस्थापन यांमुळे ते ज्ञानाचा प्रसार करणारी व्यासपिठे निर्माण करू शकले.

२. अपवर्ड फाऊंडेशन
ऑगस्ट २०१८ मध्ये श्री. आशिष यांनी ‘अपवर्ड फाउंडेशन’ची सह-स्थापना केली. ‘अपवर्ड फाऊंडेशन’ ही नवी देहलीस्थित एक ना नफा मिडिया (माध्यम) संस्था आहे, जी जागतिक आणि सांस्कृतिक आव्हानांवर बारकाईने संशोधन केलेले लहान लहान व्हिडिओ सिद्ध करते. हे व्हिडिओ बनवण्याच्या प्रक्रियेत संस्थापक आणि संचालक म्हणून ते धोरणात्मक दृष्टीकोन निश्चित करतात. त्यासाठीची माहिती गोळा करतात. ते संबंधित विषयातील तज्ञ, पत्रकार आणि विद्वान यांच्याशी बोलून विविध लिखाणाच्या भडिमारातून सुयोग्य ज्ञान निर्माण करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली अपवर्डने ‘पिनपॉईंट’, ‘आयडियाज’, ‘डीप डायव्ह’ इत्यादी प्रमुख मालिका प्रकाशित केल्या आहेत, ज्या आधुनिक भाषेत शाश्वत सांस्कृतिक मूल्यांवर सखोल विचार मांडतात.
| Hindu Unity Ki Baat Chhodo, Pehle Hindu Bano – Kashmir After 370 | w/ Ashish Dhar | TAMS 178
(सौजन्य : Awaara Musaafir) |
३. ‘प्रग्याता’ : मानसिक गुलामगिरीतून मुक्ती !
श्री. आशिष धर यांनी ‘प्रग्याता’ ही एक ‘ऑनलाईन जर्नल’ची सह-स्थापना केली. ‘प्रग्याता’ हे वसाहतवादी आणि मार्क्सवादी चौकटींना आव्हान देणार्या भारतीय सभ्यता, इतिहास, संस्कृती अन् धर्मावरील निबंध प्रकाशित करत आहे. भारताचा बौद्धिक वारसा पुन्हा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने श्री. आशिष धर हे जातीव्यवस्था, पर्यावरण, आधुनिक इतिहासलेखनातील त्रुटी यांसारख्या समग्र विषयांवर लेखांचे संकलन करतात. ‘मुख्य प्रवाहातील माहितीच्या भडीमाराला पर्यायी दृष्टीकोन प्रदान करणे आहे’, हा ‘प्रग्याता’चा मुख्य उद्देश आहे.
४. ‘इंडिक कलेक्टिव्ह ट्रस्ट’चे कार्यवाहक नेतृत्व
जून २०१७ पासून श्री. आशिष धर यांनी ‘इंडिक कलेक्टिव्ह ट्रस्ट’मध्ये ३ वर्षे ‘ऑपरेशन्स हेड’ (कार्यवाहक नेतृत्व) म्हणून काम केले. या पदावर त्यांनी भारतीय शास्त्रांच्या पुनर्जागृतीवर लक्ष केंद्रित केलेले कायदेशीर उपक्रम आणि मोहिमा यांना पाठिंबा देण्यासाठी त्याचा प्रसार करणे, समन्वय करणे, ‘आयटी’च्या (माहिती तंत्रज्ञानाच्या) दृष्टीने पायाभूत सुविधा आणि पडद्यामागील सर्व कार्ये सुरळीत होण्यासाठी सुव्यवस्थापन केले. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे तळागाळातील चळवळी आणि विद्वत्तापूर्ण प्रयत्नांमध्ये संघटन निर्माण झाले आहे, तसेच सर्वांचेच प्रयत्न प्रभावी रितीने होत आहेत.
५. वैचारिक नेतृत्व आणि सामाजिक सहभाग

श्री. आशिष धर हे एक लोकप्रिय वक्ता आणि विविध चर्चासत्रांचे सदस्य आहेत. ते नियमितपणे परिषदा, वेबिनार आणि मल्टीमिडिया मंचांवर हिंदूंचा खरा परिचय, सांस्कृतिक अस्तित्व आणि ब्राह्मण, काश्मिरी पंडित यांचा छळ यांसारख्या विषयांचे विश्लेषण करण्यासाठी उपस्थित रहातात. त्यांची यू ट्यूबवरील भाषणे जसे की, ‘काश्मीर : भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ हे त्यांचे व्यक्तीगत अनुभव अन् इतिहास यांचा उत्तम मेळ असून विस्थापनामुळे सोसाव्या लागणार्या यातनांवर ते प्रकाश टाकतात. सामाजिक माध्यमांवर ते परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील समन्वयाविषयी विविध प्रेक्षकांशी संवाद साधतात.
#PahalgamTerroristAttack संदर्भात त्यांचे विचार
|
६. वैयक्तिक पार्श्वभूमी आणि प्रभाव
काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेले श्री. आशिष धर यांनी स्वतः स्वतःच्या रहात्या घरातून, आपल्या प्रांतातून विस्थापित होणे काय असते, ते अनुभवले आहे. हा वैयक्तिक संबंध वसाहतवादाच्या वारशावर केलेल्या टीकेला जोर प्रदान करतो आणि हिंदु संस्कृतीच्या संरक्षणासाठी विविध समुदायांना एकत्र करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आणखी तीव्रता देतो. ‘अपवर्ड’ आणि ‘प्रग्याता’ यांच्या माध्यमातून ते वाचकांना अन् प्रेक्षकांना संस्थात्मक पूर्वग्रहाला (इन्स्टिट्यूशनलाईज्ड प्रीज्युडाईस) तोंड देण्यासाठी आणि हिंदु संस्कृतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी माहितीपूर्ण आघाडी निर्माण होण्यासाठी सुसज्ज करत आहेत.
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !