

‘१९.२.२०२५ या दिवशी देवाने मला धानोरा (जिल्हा बीड) येथील श्री. महादेव गायकवाड यांची त्यांच्या घरी भेट घेण्याची संधी दिली. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. दामोदर गायकवाड यांचे ते वडील आहेत. महादेवआजोबा वारकरी आहेत. या भेटीच्या दरम्यान मला त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य जाणवले. ते म्हणजे त्यांच्याकडे अनेक जण आशीर्वाद मागण्यासाठी येतात. आलेली व्यक्ती ‘व्यावहारिक कार्यात यश मिळण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आली आहे कि तिला देवाधर्माची ओढ आहे’, याची पारख करून ते विचारपूर्वक आशीर्वाद देतात. आशीर्वाद देतांना ‘देवानेच स्वतःला सुचवले आहे’, असा त्यांचा भाव असतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.३.२०२५)