‘श्री गजानन महाराजांचा वर्ण सावळा होता. सावळा रंग हा मातीचे प्रतीक आहे. या मातीत एक दाणा पेरला, तर ती तो सहस्र पटींनी परत करील. ‘देणे’, हा मृदेचा (मातीचा) गुणधर्म आहे; म्हणूनच आपले सगळे देव काळे आहेत. मग महाराज याला कसे अपवाद असतील ? श्री महाराजांनी देहात असतांना किंवा त्यानंतरही अखिल विश्वाला केवळ दिलेलेच आहे. महाराज ‘देते (दाते)’ आहेत आणि आपण ‘घेते’ आहोत.’
(साभार : ‘गजानन आशिष’, मे २०१९)