अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ७ एप्रिल (वार्ता.) – कळवा येथे एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या महेश कांबळे याला विशेष पोक्सो न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि २० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्ट २०२१ या वर्षामध्ये ही घटना घडली होती.