पिंपरी (पुणे) – ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (‘जी.बी.एस्.’) आजाराने गेल्या २४ घंट्यांत पुण्यातील २ आणि पिंपरी येथील एकाचा मृत्यू झाला, अशी महिती आरोग्य विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली. मागील ३-४ दिवसांपासून आतापर्यंत या आजाराने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. १ फेब्रुवारी या दिवशी १० बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १४० वर पोचली आहे. त्यामध्ये २६ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील, तर ७८ रुग्ण समाविष्ट गावातील आहेत. इतर जिल्ह्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून बाधित रुग्णसंख्येत २० ते २९ वयोगटातील सर्वाधिक ३२, तर ० ते ९ आणि ५० ते ५९ वयोगटातील प्रत्येकी २२ रुग्ण आहेत. १० ते १९ वयोगटातील २० रुग्ण उपचार घेत आहेत.