अवैध परप्रांतियांची तक्रार राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे करा !

पुणे – एका बांगलादेशी घुसखोराने योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची उघड धमकी दूरदर्शनवर दिली आहे. बांगलादेशी घुसखोराच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. देशाच्या सांस्कृतिक अस्तित्वाला असलेला बांगलादेशी घुसखोरांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने सतर्क रहाणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून आपण एका राष्ट्रविघातक शक्तीला दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याकडे जर दुर्लक्ष केले, तर ते राष्ट्र आणि समाजाला उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे एक देशभक्त, कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपण पुढील कृती करू शकतो.

१. जेव्हा एखादा संशयित विक्रेता (नारळ, फळ, टायर, मांस, भाजी इ.) व्यवसायात गुंतलेला आढळतो, तेव्हा त्याच्याशी एक साधा व्यवहार करा.

२. पैसे देतांना ‘जीपे’ (ऑनलाईन पैसे पाठवण्याची पद्धत) पद्धत वापरा. त्यासाठी त्याचा भ्रमणभाष क्रमांक मागा. ‘स्कॅनिंग’चा पर्याय निवडू नका; कारण या प्रकरणात आपल्याच भ्रमणभाषवर नोंदणीकृत क्रमांक लपवला जातो. (त्याने स्कॅन वापरण्याचा आग्रह धरला, तर तुम्ही त्याच्या आहारी जाऊ नका.)

३. बांगलादेशी घुसखोराची तक्रार पुढील लिंकवरील व्हॉट्सॲप क्रमांकावर करा. ‘कर्तव्यदक्ष देशभक्त नागरिक’ म्हणून ही गोष्ट नोंदवत आहोत, हा हेतू स्पष्ट करावा. राष्ट्रीय अन्वेषण अभिकरणाची लिंक https://nia.gov.in/branch-office.htm#delhihq यावर राष्ट्रीय सुरक्षायंत्रणेच्या संपर्क क्रमांकासह अन्य विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

संपादकीय भूमिका

भारतियांनो, बांगलादेशी घुसखोर असलेल्या राष्ट्रविघातक शक्तीला दूर करण्यासाठी कृतीशील पावले उचला !