विशेष म्हणजे या सर्व प्रवासाच्या सुविधेसाठी एकाच तिकिटाचा वापर केला, तरी चालणार आहे. मुंबईत प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला त्याचे प्रवासाचे नियोजन (‘ट्रॅव्हल प्लान’) या ॲपवर सिद्ध करता येणे शक्य होणार आहे.
मुंबई – येथील लोकलगाडी, मेट्रो, बेस्ट, मोनो आदी सार्वजनिक वाहतूक सुविधांचे पर्याय दाखवणारे एक अत्याधुनिक ‘ॲप’ महाराष्ट्र शासन लवकरच चालू करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी या दिवशी याची घोषणा केली. या वेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेही उपस्थित होते.
या ‘ॲप’मध्ये प्रवासाला त्याच्या ठिकाणाहून गंतव्य स्थानापर्यंत जाण्यासाठी, तसेच गंतव्य स्थानापासून त्याच्या ठिकाणापर्यंत येण्यास उपलब्ध पर्याय दाखवण्यात येईल. हे ‘ॲप’ त्या व्यक्तीला सर्वांत जवळचे वाहतुकीचे पर्याय सांगेल.