|

बरेली (उत्तरप्रदेश) – गोमांस शिजवल्याच्या वासाचा त्रास होणार्या ७९ वर्षीय वृद्ध हरबंस लाल यांनी विरोध केला. त्यामुळे शेजारील मुसलमान कुटुंबाने त्यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना येथील निळकंठ कॉलनीमध्ये घडली. विशेष म्हणजे हरबंस लाल काश्मिरी हिंदू असून तेथे होणार्या अत्याचारांमुळे ते बरेलीमध्ये रहायला आले होते. या प्रकरणाची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांनी हरबंस लाल यांचे पार्थिव रस्त्यावर ठेवून आंदोलनही केले.
हरबंस यांना गोमांसाचा वास आवडत नसल्याने ते त्यांच्या घरात फायबर शीट बसवत होते. यामुळे शेजारी रहाणार्या सगीर अहमद याने त्यांच्याशी वाद घातला आणि नंतर सगीर, त्याचा मुलगा इम्रान आणि त्याची पत्नी यांनी हरबंस यांना मारहाण केली. यात ते घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर डॉक्टांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून मुसलमान कुटुंब पसार झाले आहे.
संकुलातील ३२ पैकी केवळ १ घरच मुसलमानाचे !
केवळ एक घर असल्यावर इतका त्रास होतो आणि एकाचे १० झाल्यावर हिंदूंना पलायन करावे लागते, हे हिंदूंना कधी कळणार ?
हरबंस यांचा मुलगा हेमंत लाल म्हणाला की, सगीरच्या घरी प्रतिदिन मांस शिजवले जात होते आणि माझ्या वडिलांना याची समस्या होती. जेव्हा सगीरने नकार देऊनही त्याचे ऐकले नाही, तेव्हा वडिलांनी फायबर शीट बसवण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यावरही सगीरने आक्षेप घेतला आणि मारहाण केली. संपूर्ण संकुलात हिंदूंची ३२ घरे आहेत, तर केवळ १ घर मुसलमानाचे, म्हणजे सगीरचे आहे. इतर कोणतेही कुटुंब वाद निर्माण करणार नव्हते; सगीर अहमद सतत वाद निर्माण करायचा.
संपादकीय भूमिका
|