Taslima Nasrin On Bangladesh Hindus : बांगलादेशात गोमांस न विकणार्‍या हिंदूंच्या उपाहारगृहांवर होत आहेत आक्रमणे ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी दिली माहिती !

तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशामध्ये जिहादी मुसलमान गोमांस न देणार्‍या रेस्टॉरंटवर आक्रमणे करत आहेत. त्यांचा दावा आहे की, मुसलमानबहुल देशात गोमांस विकणे अनिवार्य आहे. अन्यथा उपाहारगृह नष्ट केले जातील किंवा बंद केले जातील. जर उपाहारगृह हिंदूंचे असेल, तर धमक्या आणि आक्रमणे चौपट वाढतील. ते हिंदूंना गोमांस खाण्यास भाग पाडण्याचा निर्धार करत आहेत, अशी पोस्ट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर केली आहे. तस्लिमा या गेल्या अनेक वर्षांपासून भारतात विस्थापित म्हणू रहात आहेत. धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला होता.

तस्लिमा यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की,

१. हिंदूंवरील आक्रमणांवर युनूस सरकार निष्क्रीय !

हिंदूंना त्यांच्या स्वतःच्या भूमीत टिकून रहाण्यासाठी आणखी काय करावे लागेल ? हिंदूविरोधी जिहादी हिंदूंवर अशा प्रकारे आक्रमणे करत आहेत की, ज्याकडे युनूसच्या सरकारचे लक्ष जाऊ नये ? काही कारवाई झाली आहे का ? अर्थात् नाही.

२. दुष्कृत्यांचे टोक गाठणारे जिहादी !

मी रामना काली मंदिरात झाडाला बांधलेले दोन माईक दाखवणारा व्हिडिओही पाहिला, ज्यामध्ये इस्लामी प्रार्थनांचे प्रसारण केले जात आहे. जवळच मशीद नाही किंवा रामना येथे कोणताही धार्मिक मेळावा होत नाही. हे कृत्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी आणि त्यांना भीतीच्या स्थितीत ठेवण्यासाठी केले जात आहे, असे दिसते. जिहादी त्यांच्या दुष्कृत्यांमध्ये कोणतीही कमतरता ठेवत नाहीत.

३. मुसलमानांचे पूर्वज बंगाली असतांना ते स्वतःला अरबी समजतात !

मुसलमान इतके असहिष्णु का आहेत ? त्यांचे पूर्वज नामशुद्र (बंगालमधील पूर्वीचे मासेमार) होते, तरीही ते मानतात की, त्यांचे पूर्वज अरब भूमीतून आले होते. वास्तव नाकारून ते कल्पनारम्य जगात रहातात. हा समुदाय अत्यंत हिंसक आणि द्वेषपूर्ण आहे. ते शाश्वत स्वर्गाचे स्वप्न पहातात जिथे ते कुमारीकांशी लग्न करतील आणि ही कल्पना त्यांच्या कृतींना चालना देते.

४. पैगंबरांच्या अनुयायांकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे व्यर्थ !

दुसर्‍या दिवशी त्यांनी स्थानिक लोकांना क्षुल्लक कारणांसाठी क्रूरपणे मारहाण केली. पैगंबरांच्या अनुयायांकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे व्यर्थ वाटते. तरीही मला आशा आहे की, मानवता, करुणा आणि सहिष्णुता यांनी त्यांना काहीतरी शिकवले असेल. बांगलादेशातील बहुतांश मुसलमानांनी या मूल्यांचा एक अंशही अद्याप शिकलेला नाही, हे पाहून मी निराश होते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंचा वंशसंहार होत असतांना भारतातील हिंदू निष्क्रीय रहाणे लज्जास्पद !