राष्‍ट्रध्‍वजाविषयी आदर आणि देवाविषयी आवड असलेला ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा अन् उच्‍च स्‍वर्गलोकातून जन्‍माला आलेला आजमगड (उत्तरप्रदेश) येथील कु. पार्थ रणविजय सत्‍यार्थी (वय ९ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. पार्थ सत्‍यार्थी हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्‍ये कु. पार्थ रणविजय सत्‍यार्थी याची आध्‍यात्मिक पातळी ५१ टक्‍के आहे.’ – संकलक)

कु. पार्थ रणविजय सत्‍यार्थी

कु. पार्थ सत्‍यार्थी याला त्‍याच्‍या ९ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

________________________________________________________

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मार्गशीर्ष शुक्‍ल अष्‍टमी (९.१२.२०२४) या दिवशी कु. पार्थ सत्‍यार्थी याचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आईच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहे.

सौ. पूनम सत्‍यार्थी

१. नीटनेटकेपणाची आवड

‘एकदा कु. पार्थ अभ्‍यास करत असतांना त्‍याने एकदा लिहिलेले खोडून परत लिहीत होता. याविषयी मी त्‍याला विचारल्‍यावर तो म्‍हणाला, ‘‘आधी मी अक्षर चांगले काढले नव्‍हते. आता मी चांगले अक्षर काढून नीट लिहिण्‍याचा प्रयत्न करत आहे.’’

२. घरकामात साहाय्‍य करणे

तो मला घरकामात साहाय्‍य करतो. मी रुग्‍णाईत असल्‍यास तो त्‍याच्‍या वडिलांना भोजन बनवणे आणि भांडी घासणे, यांसारख्‍या कामांत साहाय्‍य करतो.

३. त्‍यागी वृत्ती

३ अ. मंदिरात अर्पण करण्‍यासाठी आईकडे पैसे मागणे : एकदा आम्‍ही वाराणसी आश्रमातील ध्‍यानमंदिरात दर्शन घेण्‍यासाठी गेलो होतो. तेव्‍हा पार्थचे तेथील अर्पण पेटीकडे लक्ष गेले. त्‍याने माझ्‍याकडे अर्पण करण्‍यासाठी पैसे मागितले. मी पैसे दिल्‍यावर त्‍याला आनंद झाला आणि त्‍याने ते पैसे अर्पण केले.

३ आ. घरातील देवघरातही अर्पण पेटी ठेवणे आणि आईला त्‍यात पैसे अर्पण करण्‍याची आठवण करून देणे : दुसर्‍या दिवशी आम्‍ही घरी पूजा करत होतो. तेव्‍हा तो मला म्‍हणाला, ‘‘आई, आश्रमातील ध्‍यानमंदिरासारखीच आपणही आपल्‍या देवघरात अर्पण पेटी ठेवूया.’’ त्‍याने लगेचच अर्पण पेटी सिद्ध करून देवघरात ठेवली आणि मला म्‍हणाला, ‘‘आजपासून आपण यात प्रतिदिन पैसे अर्पण करूया.’’ तो आम्‍हाला पैसे अर्पण करण्‍याची आठवण करून देतो आणि त्‍याने स्‍वतः जमा केलेले पैसे अर्पण करतो.

४. देवाची आवड

अ. आम्‍ही (मी आणि पार्थ) प्रतिदिन देवपूजा करतो. तेव्‍हा पार्थ मला प्रतिदिन वाराप्रमाणे त्‍या त्‍या देवतेची आरती करायला सांगतो, उदा. सोमवारी शिवाची, मंगळवारी गणपतीची इत्‍यादी.

आ. तो माझ्‍या समवेत शनिवारी हनुमानचालिसा म्‍हणण्‍याचा प्रयत्न करतो.

५. राष्‍ट्रध्‍वजाप्रती आदर

अ. एकदा त्‍याला मार्गात एक राष्‍ट्रध्‍वज पडलेला दिसला. तेव्‍हा त्‍याने तो लगेच उचलून माझ्‍याकडे दिला आणि मला सांगितले, ‘‘आपण याचे विसर्जन करूया.’’

आ. २६ जानेवारी या दिवशी आमच्‍या घरासमोर २ राष्‍ट्रध्‍वज उंच ठिकाणी लावले होते. काही दिवसांनंतर त्‍यातील एक ध्‍वज फाटला. तेव्‍हा पार्थने ते माझ्‍या लक्षात आणून दिले.

६. चुकांविषयी संवेदनशील

आम्‍ही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहाण्‍यासाठी वाराणसी आश्रमात गेलो होतो. तेव्‍हा तेथील एका साधिकेने पार्थला विचारले, ‘‘आज तुझ्‍याकडून कोणती चूक झाली ?’’ तेव्‍हा त्‍याने त्‍याची चूक सांगितली आणि ताईने सांगितल्‍याप्रमाणे त्‍याने ती चूक फलकावरही लिहिली.

७. भाव

७ अ. प्रार्थना भावपूर्ण लिहून त्‍या प्रतिदिन वाचणे : एका साधिकेने पार्थला एक वही दिली आणि त्‍यानेे प्रतिदिन करायच्‍या काही प्रार्थना त्‍यात लिहायला सांगितल्‍या. ताई सांगत असतांना पार्थ प्रार्थना भावपूर्णरित्‍या लिहीत होता. तो प्रतिदिन त्‍या प्रार्थना वाचत आहे.

७ आ. तो मला नेहमी ‘आपण रामनाथी आश्रमात गुरुदेवांचे दर्शन घ्‍यायला कधी जायचे ?’, असे विचारतो.

७ इ. तो ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ भावपूर्ण पहातो.

८. अनुभूती

८ अ. पार्थ समवेत असतांना त्‍याच्‍यातील सात्त्विकतेची अनुभूती येणे : एकदा आम्‍ही मंदिरात प्रदक्षिणा घालत होतो. त्‍या वेळी मंदिराच्‍या गाभार्‍यातील पुजार्‍याने अन्‍य कुणाला न देता आम्‍हाला (मी आणि पार्थ यांना) फुलांची माळ दिली. तेव्‍हा पार्थमध्‍ये असणार्‍या सात्त्विकतेची मला जाणीव झाली आणि माझी प.पू. डॉक्‍टरांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

८ आ. वाईट स्‍वप्‍ने पडल्‍यावर वाटणारी भीती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्‍यावर न्‍यून होणे : पार्थला रात्री वाईट स्‍वप्‍ने पडल्‍यास तो उठून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतो. काही वेळानंतर त्‍याची भीती न्‍यून होते. तो सकाळी उठल्‍यानंतर याविषयी मला सांगतो.

– सौ. पूनम सत्‍यार्थी (कु. पार्थची आई), आजमगड (उत्तरप्रदेश) (१०.४.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.