वनवासी क्षेत्रातील धर्मांतर कसे थांबवायचे ?

१. नाशिक (महाराष्ट्र), डांग आणि तापी (गुजरात) या जिल्ह्यांमध्ये आदिवासींचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर

महाराष्ट्र सीमेवरील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी होत होती. नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधून त्यांच्या गाड्या बाहेर जात असत. त्यांना पकडण्यासाठी आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो. गोरक्षणासह मी काही वर्षांपासून आदिवासी क्षेत्रात धर्मांतर केलेल्या लोकांना मूळ हिंदु धर्मात परत आणण्याचेही काम (घरवापसी) करत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, गुजरातमधील डांग आणि तापी या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर केलेले लोक आहेत. ते हिंदूंच्या विरोधात आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती. ते गायींचे रक्षण करत नव्हते. पशूवधगृहात गायी पाठवण्यासंदर्भात त्यांचा पाठिंबा होता. हे लक्षात आल्यावर या आदिवासी क्षेत्रातील धर्मांतरित लोकांना हिंदु धर्मात परत आणण्याचे ठरवले.

२. आदिवासींचे धर्मांतर करण्याची ख्रिस्त्यांची पद्धत

आम्ही त्या ठिकाणी जागृती मोहीम चालू केली. प्रारंभी एक वर्ष डांग आणि तापी जिल्ह्यातील गावोगावी जाऊन लोकांना एकत्रित करून जागृत केले. तेथील हिंदु आदिवासींनी आम्हाला सांगितले, ‘‘येथे बाहेरून ख्रिस्ती लोक येतात. त्यांच्यामुळे हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट होत आहे. आम्ही पुष्कळ संकटात आहोत.’’ यात सर्वांत मोठी चूक आपली, म्हणजेच हिंदूंची आहे. आपले साधू-संत आदिवासी भागात जात नाहीत. ख्रिस्ती पाद्री हे गरीब आणि आदिवासी यांच्या घरी जातात. लहान मुलांना जवळ घेतात, तसेच आदिवासींच्या समवेत बसून भोजन करतात. मुलांच्या आई-वडिलांना वाटते की, हे बाहेरचे लोक ख्रिस्ती असूनही त्यांच्या मुलांना जवळ घेतात, तसेच त्यांना बिस्किटे आणि कपडे देतात. अशा प्रकारे ख्रिस्ती आदिवासींच्या भावना आणि मने जिंकून घेतात. त्यानंतर ते म्हणतात, ‘मुले शाळेत जातात का ?’ त्यांनी सांगितले, ‘पैसे आणि कपडे नाहीत.’ तेव्हा हे लोक त्यांच्या मुलांना कपडेही देतात. आई-वडिलांना मुलांना शाळेत पाठवण्यास सांगतात. मुले शाळेत गेल्यानंतर आई-वडिलांना चर्चमध्ये येण्यास सांगितले जाते. अनुमाने २-३ आठवड्यानंतर त्यांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास सांगतात. अशा प्रकारचे षड्यंत्र सर्व आदिवासी क्षेत्रात चालू आहे.


श्री. महेंद्र राजपुरोहित यांचा परिचय

श्री. महेंद्र राजपुरोहित

श्री. महेंद्र राजपुरोहित ‘अग्नीवीर हिंदु संघटने’चे राष्ट्रीय संघटनमंत्री आहेत. ही संघटना धर्मांतर केलेल्या हिंदूंना स्वधर्मात आणणे आणि वैदिक शिक्षण देण्याचे कार्य करते. ही संघटना ‘लव्ह जिहाद’पासून हिंदु मुलींचे रक्षण करण्याचेही कार्य करते. जातीय एकता, जाती यज्ञ, जानव्यांचे वितरण, शिक्षण, रोजगार यांसारख्या प्रकल्पाद्वारे शेकडो परिवारांना संघटनेकडून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. उत्तरप्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये २ सहस्र मुलांना नि:शुल्क शिक्षण देत आहे. पाकिस्तानमधून परतलेल्या १०० हून अधिक कुटुंबांना घर बांधून देण्यासाठी यांनी साहाय्य केले आहे. मागील १० वर्षांपासून अग्नीवीर संघटनेकडून १ लाखांहून अधिक गोवंशियांचे रक्षण करण्यात आले आहे.

३. ख्रिस्ती धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात आणण्याचे प्रयत्न

अ. भजन-कीर्तन आणि वैदिक यज्ञ यांचे आयोजन : ख्रिस्ती धर्मांतर थांबवण्याचे कार्य चालू केल्याच्या एक वर्षाने आम्ही डांग क्षेत्रात भजन-कीर्तन आणि वैदिक यज्ञ यांचा कार्यक्रम आयोजित केला. मला सांगायला संकोच वाटतो की, त्या क्षेत्रातील अदिवासींनी प्रथमच हनुमानाचे पदक (लॉकेट) बघितले. यज्ञाचे हवन करण्यासाठी त्यांना बसायला सांगितल्यावर ते रडायला लागले. ‘आम्ही असे कधीही पाहिलेले नाही’, असे ते म्हणू लागले. यातून ‘आपल्याला अगदी मुळापासून कार्य करावे लागेल’, असे आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही त्या लोकांच्या कुटुंबांना भेटलो. त्यांना ‘घरवापसी’ करण्यास स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो. त्यामुळे भांडणे झाली असती.

आ. तरुणांसाठी खेळांच्या स्पर्धा आणि सामूहिक विवाह यांचे आयोजन : सर्वप्रथम आम्ही १०८ मुलींचे सामूहिक विवाह करवून दिले, ही आमची पहिली मोहिम होती. त्यात आम्हाला यश मिळाले. त्यानंतर तरुणांसाठी खेळांचे आयोजन केले. ‘वन्दे मातरम्’ म्हटले पाहिजे, घरावर भगवा झेंडा लावला पाहिजे, असे त्यांना खेळाच्या माध्यमातून सांगितले. या सर्व गोष्टींसाठी प्रारंभी विरोध झाला; परंतु हे अग्नीवीर आता थांबणार नाहीत, त्यांच्या योजनानुसार ते काम करणारच, हे सर्वांच्या लक्षात आहे. तरुणांसाठी खेळ आणि सामूहिक विवाह चालू केले.

इ. महिलांसाठी रोजगारांची निर्मिती : डांग क्षेत्रात ‘नागलिक’ नावाचे एक धान्य उगवते. आम्ही महिलांना त्याचे पापड बनवण्यास सांगितले, तसेच ते खरेदी करण्याची सिद्धता दाखवली. त्याच्यासाठी आम्ही बाजारपेठ निर्माण केली. सुरत येथे साडीवर चकचकीत खडे लावले जातात. आम्ही सुरतच्या व्यापार्‍यांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला शहरापेक्षा अल्प किमतीत साडीवर खडे लावून देऊ शकतो. डांग क्षेत्रातील भगिनींना हे काम करायला सांगितले. त्या ठिकाणी ऋतूनुसार लोणची बनवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे आम्ही युवा शक्ती सज्ज केली. त्यानंतर आपण धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेऊ शकतो, असे वाटले. आम्ही डांग क्षेत्रातील कालिबिल या गावात प्रथमच १०८ कुटुंबांना स्वधर्मात घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले.

ई. प्रशासन आणि पोलीस यांच्या अडथळ्यातून सुटका : या कार्यक्रमात अडचण येणार, याची कल्पना होती. आधारकार्ड आदी सर्व कागदपत्रे घेऊन आम्ही या कार्यक्रमाची सिद्धता केली होती. त्या ठिकाणी ‘शुद्धीकरण यज्ञ’ असा फलक लावला होता आणि ‘घरवापसी’चे कुठेही नाव नव्हते. या कार्यक्रमाच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे कुणीतरी तक्रार केली. त्यानंतर पोलीस आणि प्रशासन यांचे लोक आले. ते म्हणाले, ‘‘हे तुम्ही काय करत आहात ?’’ मी म्हणालो, ‘‘शुद्धी करत आहे.’’  ते म्हणाले, ‘‘ही शुद्धी काय असते ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘आमच्या सनातन धर्मात कुणी मासे, मटण खात असेल, दारू पित असेल, तर त्यांच्या शरिराची शुद्धी करण्यासाठी यज्ञ केला जातो. हे त्याचेच आयोजन आहे.’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही तर लोकांचे धर्मांतर घरवापसी करत आहात.’’ घरवापसी काय आहे, हे मला ठाऊक नसल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर पोलीस म्हणाले, ‘‘तुम्ही ख्रिस्त्यांना हिंदु बनवत आहात, असे हे म्हणत आहेत.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘माझ्याकडे १०८ लोकांचे आधार कार्डपासून सर्व सरकारी कागदपत्रे आहेत. आपण तपासणी करू शकता. यातील एक जरी ख्रिस्ती असेल, तर तुम्ही मला शिक्षा करा. धर्मांतर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची अनुमती घ्यावी लागते, हे मला ठाऊक आहे.’’ सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ते पाद्र्यांना म्हणाले की, हे धर्मांतर नाही; कारण हे सर्व पूर्वी हिंदूंच होते.

४. धर्मांतर केल्यानंतर हिंदु आदिवासी म्हणून सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे षड्यंत्र

‘धर्मानुसार तुम्ही ख्रिस्ती बना; पण सरकारी नोकरी मिळाली, तर तुम्ही आदिवासी रहा’, असे हे षड्यंत्र आहे. या विचारसरणीमुळे आदिवासी समाजाला तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या ठिकाणी कोणताही हिंदु समाज किंवा हिंदु संघटना कार्यरत नाही. आपल्याला अगदी खालच्या स्तरावर जाऊन कार्य करावे लागणार आहे. आदिवासी आपले बंधू असून ते सर्वांत कट्टर आहेत. ज्या वेळी आपण आदिवासी क्षेत्रात जातो, त्या वेळी आपल्याला त्यांच्या घरासमोर तुळशीचे रोप दिसते. त्यांच्या घरात एक गाय असते. ज्या वेळी ते घरातून बाहेर पडतात, त्या वेळी त्यांच्या गळ्यात भगवे कापड असते. आपल्याला टिळा लावण्यात आणि गळ्यात सुती कपडा घालण्यास संकोच वाटतो; परंतु ते आपल्याला भेटतात, तेव्हा ‘राम राम’, असे म्हणतात. हे आपले कट्टर हिंदु आहेत; पण आज आपण त्यांना विसरलो आहोत. अशा लोकांना ख्रिस्ती जवळ करत आहेत.

 ५.  ९ सहस्र परिवारांची ‘घरवापसी’

आदिवासी कट्टर हिंदु असतांना धर्मांतर का करत आहेत ?, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला वाटते, ‘ते आदिवासी आहेत, सोडून कुठे जाणार?’, या विचारांमुळे आपला आदिवासी समाज आपल्या हाताबाहेर जात आहे. ज्या वेळी आम्ही ही मोहीम हातात घेतली, तेव्हा आम्हाला अग्नीवीर ठरवण्याचे कार्य करायचे होते. मी केवळ डांग क्षेत्राविषयी बोलत आहे. कागदपत्रे असल्याने आम्ही ९ सहस्र कुटुंबांचे सामाजिक माध्यमांसमोर धर्मांतर केले. त्यांनी कशा प्रकारे ख्रिस्ती पंथ स्वीकारला आणि आता परत हिंदु कसे बनत आहेत, हे आम्ही सामाजिक माध्यमांना बोलावून सांगतो. अग्नीवीर कोणतेही काम लपूनछपून करत नाही; कारण आम्हाला लोकांना जागृत करायचे आहे.

सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) अपप्रचार करून लोकांना प्रक्षुब्ध जाते. त्यातून आपण आपले शत्रू निर्माण करतो. कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी धर्मांतरासारख्या गोष्टी सामाजिक माध्यमांवर दाखवल्या गेल्या पाहिजेत. आदिवासी समाजाची स्थिती काय आहे, अन्य समाजाला कळावे, यासाठी आम्ही सामाजिक माध्यमांवर ९ सहस्र परिवारांची ‘घरवापसी’ दाखवली.

६. ‘अग्नीवीर’ संघटनेकडून २५० कसायांवर खटले प्रविष्ट (दाखल) !

याप्रमाणे सर्व आदिवासी क्षेत्रांमध्ये आमचे कार्य चालू आहे. सध्या गुजरातच्या  आदिवासी क्षेत्रात आम्ही कार्य करत आहोत. मला कुणाचीही भीती वाटत नाही. मी उघडपणे गोरक्षणाचे कार्य करतो. त्यामुळे कारागृह हे माझे घरच झाले आहे. वर्षातून २-३ वेळेला मी कारागृहात जातो. न्यायालय हे माझे कार्यालय झाले आहे. माझे २५० कसायांवर खटले चालू आहेत. एका वेळी ३-३ न्यायालयांमध्ये मला उपस्थित रहावे लागते; पण हा माझा धर्म आहे. हे कार्य करण्यासाठी ईश्वराने मला निमित्त करून पाठवले आहे. त्यानुसार कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप हे माझे आदर्श आहेत. माझ्या पूर्वजांनी मला हिंदु म्हणून जन्माला घातले. कपाळावर लावलेला टिळा ही माझ्या पूर्वजांच्या बलीदानाची आठवण आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्याला मी अपमानित होऊ देणार नाही. ‘आमच्या पूर्वजांनी बलीदान केले’, असे म्हणणारे हिंदू आता राहिले नाहीत. आपल्या पूर्वजांनी मुसलमानांचे अत्याचार सहन केले, ब्रिटिशांचे राज्य सहन केले आणि तरीही ते हिंदु बनून राहिले अन् आम्हालाही त्यांनी हिंदु म्हणूनच जन्माला घातले. आज लोभापायी धर्मांतर केले जाते.

७. आदिवासी क्षेत्रातील १५ सहस्र लोकांची स्वसंरक्षणाची सिद्धता

आपले पितामह भीष्म शेकडो बाणांवर झोपले होते. त्यांच्या इच्छेने त्यांनी त्यांचे प्राण त्यागले. हा आपला इतिहास आहे. एक मासापूर्वी ३०० कुटुंबांची मी एकाच वेळी ‘घरवापसी’ केली. प्रसारमाध्यमांनाही आम्ही बोलावले होते आणि सर्वांना भगवे ध्वज दिले होते. हा भगवा ध्वज घरावर लावला जाईल. प्रत्येक शनिवारी त्या भागात भजन, कीर्तन चालते. त्या दिवशी आम्ही भंडार्‍याचीही व्यवस्था करतो. ज्या ठिकाणी हिंदुविरोधी शक्ती कार्यरत आहेत, अशा आदिवासी क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. तापी (गुजरात) क्षेत्रात ७५ टक्के ख्रिस्ती आहेत. त्या भागात भगवा ध्वज लावणे, हे मृत्यूला आमंत्रण देण्याप्रमाणे आहे. आजपर्यंत आम्ही आदिवासी क्षेत्रातील १५ सहस्र लोकांना स्वसंरक्षणासाठी सिद्ध केले.

८. अग्नीवीर संस्थेची गोतस्करांमध्ये दहशत

मालेगाव, म्हणजे लहानसा पाकिस्तानच आहे. त्या ठिकाणी ईदच्या काळात आम्ही कसायीच्या १५० गाड्या एक वर्षात पकडल्या. आमचे अग्नीवीर कार्यकर्ते तेथे पुष्कळ चांगले कार्य करत आहेत. एक गाडी पकडली, तर ५ सहस्र रुपयांचा पुरस्कार दिला जातो. काही अडचण असेल, तर अग्नीवीर त्यांच्यासमवेत उभे आहेत. ‘आज महेंद्र यांनी कुणाला मारले ?’, हे पहाण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कसाई आधी आमचे ‘फेसबुक’ तपासतो. अशा प्रकारची भीती आम्ही निर्माण केली आहे.

९. तरुणांना आवाहन

तरुणांना माझे सांगणे आहे की, जर आपण सनातन धर्म मानत असाल, तर आपला ‘मृत्यू ठरलेला आहे’, हे सत्य आहे. ज्या दिवशी आपला जन्म होतो, तेव्हाच आपल्या मृत्यूची वेळ आणि जागा ठरलेली असते, मग आपण घाबरायचे कशाला ? घाबरल्याने आपण प्रतिदिन थोडे थोडे मरतो. यापेक्षा देश आणि धर्म यांसाठी एकदाच मरा ! गीतेत म्हटले आहे, ‘धर्मासाठी जो मरण पत्करतो त्याला मोक्षप्राप्ती होते.’

– श्री. महेंद्र राजपुरोहित, अग्नीवीर हिंदु संघटना, गुजरात.