संकल्पाच्या संन्यासाने, म्हणजे संकल्पाचा त्याग केल्यानेच केवळ योगी होण्याची पात्रता येत असते. ‘हे हवे, हे नको’, याचे नाव संकल्प ! ‘हे घडले पाहिजे, हे घडता कामा नये’, याचे नाव संकल्प ! असे हे हवे-नको ज्याच्या अंतःकरणातून नाहीसे झाले किंवा ज्याने ते प्रयत्नपूर्वक नाहीसे केले, त्यालाच योगी होण्याची पात्रता प्राप्त होते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘आत्मसंयोग योग’)