क्षणोक्षणी जाणीव देवाची ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करणारे ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे साधक श्री. अविनाश जाधव यांना गुरुकृपेने सूचलेले काव्‍य येथे दिले आहे.

श्री. अविनाश जाधव

क्षणोक्षणी देवा (टीप), तुझी आठवण येते ।
तुझ्‍या आठवणीने मन भरून येते ॥ १ ॥

क्षणोक्षणी देवा, तुझे रूप दिसते ।
तुझे रूप न्‍याहाळतांना डोळ्‍यांना पाझर फुटतो ॥ २ ॥

क्षणोक्षणी देवा, कंठातून ध्‍वनी निर्माण होतो ।
कंठातील हा ध्‍वनी तुझ्‍या भक्‍तीचा गोडवा गातो ॥ ३ ॥

क्षणोक्षणी देवा, हृदयात गारवा येतो ।
या गारव्‍यातून तुझ्‍या अस्‍तित्‍वाची चाहुल लाभते ॥ ४ ॥

क्षणोक्षणी देवा, तुझे चराचरांत दर्शन होते ।
जणू चराचरांसमोर नतमस्‍तक होण्‍याची जाणीव तू करून देतो ॥ ५ ॥

क्षणोक्षणी देवा, तुझा नाद ऐकू येतो ।
या नादातून हे जीवन चैतन्‍यमय होऊन जाते ॥ ६ ॥

क्षणोक्षणी देवा, तुझा वरदहस्‍त लाभतो ।
तुझ्‍या या कृपाछत्राखाली हे जीवन समर्पित होते ॥ ७ ॥

क्षणोक्षणी देवा, तुझ्‍या भेटीची आतुरता असते ।
या भेटीतून या जिवाला जन्‍मोजन्‍मीच्‍या पापांतून ।
मुक्‍ती मिळाल्‍याची मनाला तृप्‍ती मिळते ॥ ८ ॥

क्षणोक्षणी देवा, तव चरणी मजला ठेव ।
तव चरणी एकरूपतेचा मला आस्‍वाद घेता येऊ दे ॥ ९ ॥

टीप – परात्‍पर गुरु डॉ. आठवले

॥ श्रीमन्‍नारायणमस्‍तु ॥

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, गोवा.