१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले नित्य समवेत आहेत’, असे वाटत असल्यामुळे ‘रामनाथी, गोवा येथील आश्रमात जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटावे’, असे न वाटणे
‘मला सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक आणि अनेक साधक सांगत असत, ‘ताई, तुम्ही रामनाथी आश्रमात जाऊन या ’; परंतु मला मनातून ‘रामनाथी आश्रमात जायला हवे, गुरुदेवांना भेटायला हवे’, असे कधी वाटायचेच नाही; कारण मला वाटायचे, ‘सेवांच्या माध्यमातून गुरुदेव नेहमी माझ्या समवेतच असतात, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ’ आणि अनेक भावसोहळे यांतून गुरुदेव नित्य भेटतात.’ त्यामुळे ‘मला गुरुदेव भेटलेले नाहीत’, असे कधी वाटलेेच नाही.
नंतर मला वाटले, ‘मी रामनाथी आश्रमात का जात नाही ? गुरुदेवांनी मला अध्यात्म जगायला शिकवून जीवनाचा योग्य मार्ग दाखवला आहे. मला ‘त्यांना मला भेटावे’, असे वाटत नाही; म्हणजे मी किती कृतघ्न आहे.’
२. मी रामनाथी, गोवा येथील आश्रमात गेल्यावर मला गुरुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेव्हा मला ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटले.
‘गुरुदेवांनी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला साधनारत ठेवावे आणि त्यांच्या चरणांची धूळ म्हणून त्यांच्या चरणी ठेवावे’, हीच त्यांच्या पावन चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीमती शीतल शिरिष नेरलेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५५ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |