रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर संत आणि मान्यवर यांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. परम पूज्य श्री श्री वीरभद्र शिवाचार्य स्वामीजी (पिठाधीपती, श्री बेल्लहोन्नुर खास शाखा मठ,) श्रीक्षेत्र सिद्धर बेट, चिक्कमंगळुरू, कर्नाटक.

परम पूज्य श्री श्री वीरभद्र शिवाचार्य स्वामीजी

अ. ‘वैचारिक आणि वैज्ञानिक स्तरांवर आपल्या धर्माविषयी समजावून सांगितल्यामुळे आनंद मिळाला.

आ. हा आश्रम सर्वांना ‘ज्ञान’ वाटत आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीलाही आध्यात्मिक आनंद मिळत आहे.’

२. श्री. रवीकुमार एच्. आर्. (कार्यदर्शी, श्री सिगंदुरू चौडेश्वरी मंदिर), सिगंदुरू, सागर, शिवमोग्गा, कर्नाटक.

अ. ‘आश्रम अत्युत्तम आहे.’

३. श्री. मोहन के. एल्. (धर्मादर्शी, श्री रामेश्वर मंदिर ट्रस्ट), शिवमोग्गा, कर्नाटक.

अ. ‘येथे आल्यानंतर सनातन धर्माविषयी माहिती मिळाल्यावर खरेच आपल्या धर्माविषयी अनेक महत्त्वाचे विषय समजले.

आ. ‘आम्हालाही या पुढे साधना करावी आणि तुमच्या कार्यक्रमात तुमच्या समवेत सहभागी व्हावे’, असे वाटते.’

४. श्री. मूर्ती के. के. (अध्यक्ष, श्री महिषा मर्दिनी आणि श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर), तीर्थहळ्ळी, शिवमोग्गा, कर्नाटक.

अ. ‘आश्रम पाहून मलाही ‘सेवा करावी’, असे वाटले.

आ. माझ्या जीवनातील हे साधनेचे पहिले पाऊल आहे.’

५. श्री. शिवय्या एन्. शास्त्री (कार्याध्यक्ष, जय कर्नाटक जनपरा वेदिके [जय कर्नाटक लोकोपकारी मंच]), शिवमोग्गा, कर्नाटक.

अ. ‘आश्रम म्हणजे शिवालय आहे’, असे वाटले.

आ. मला येथे आल्यावर ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटले.

आ. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात आम्हीही सहभागी होऊ.’

६. श्री. मल्लेश एन्. (जिल्हा गोरक्षक प्रमुख विश्व हिंदु परिषद), शिवमोग्गा, कर्नाटक. 

अ. ‘आश्रमात पुष्कळ सात्त्विकता जाणवली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक