१. श्री. विलास कुंठे (विश्वस्त, विठ्ठल हरि मंदिर), धारवाड, कर्नाटक.
अ. ‘आश्रमातील साधक करत असलेली साधना पाहून मला पुष्कळ शिकायला मिळाले.
आ. आश्रमात आल्यानंतर माझी येथून जाण्याची इच्छा होत नाही.’
२. अधिवक्ता पितांबर के., मंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रमाचे व्यवस्थापन परिपूर्ण आहे.
आ. येथील साधक शिस्तप्रिय आहेत.
इ. ‘असे आश्रम जगभरात व्हायला हवेत’, असे मला वाटले.’
३. अधिवक्त्या (सौ.) अनिता किणी, मंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रमात मला पुष्कळ शिकायला मिळाले.
आ. येथे मला साधनेविषयी मार्गदर्शन मिळाले आणि त्यानुसार आचरण करण्यास मी वचनबद्ध आहे.
इ. सनातनचा हा आश्रम आम्हाला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी ऊर्जा आणि बळ देतो.’
४. अधिवक्ता ईश्वर कोट्टरी (अध्यक्ष, अधिवक्ता परिषद), मंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रमात सकारात्मक ऊर्जा आहे.
आ. मला आश्रमात अधिक काळ राहून पुष्कळ शिकायचे आहे.’ (२८.६.२०२४)