शांत आणि स्थिर असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बेंगळुरू (कर्नाटक) येथील कु. देवकृष्ण जगताप (वय १२ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देवकृष्ण जगताप हा या पिढीतील एक आहे !

कार्तिक शुक्ल दशमी (११.११.२०२४) या दिवशी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. देवकृष्ण जगताप याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. दीप्ती जगताप यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. देवकृष्ण जगताप

कु. देवकृष्ण जगताप याला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. शांत स्वभाव

सौ. दीप्ती विनय जगताप

अ. ‘देवकृष्ण जन्मापासून शांत आहे. ‘हा पुष्कळ शांत आहे’, असे सद्गुरु सत्यवानदादा (सद्गुरु सत्यवान कदम) म्हणत असत. मी सेवा करत असतांनाही तो शांत असायचा.

आ. त्याच्या शिक्षकांना तो पुष्कळ आवडतो. ‘हा पुष्कळ सद्वर्तनी (उत्तम वागणूक असलेला) आणि शांत स्वभावाचा मुलगा आहे’, असे त्याच्या शाळेतील शिक्षक सांगतात.

२. शिकण्याची वृत्ती

‘देवकृष्णला नवीन विषय शिकणे आवडते. तो वर्गातील सर्व कृतींमध्ये उत्साह दाखवतो. त्याच्यात पुष्कळ आत्मविश्वास आहे’, असे शाळेतील त्याचे शिक्षक सांगतात.

३. परिस्थिती स्वीकारणे

यश अथवा अपयश काहीही असो, तो ती परिस्थिती स्वीकारतो. त्याचे मन सर्व परिस्थितीत शांत आणि स्थिर असते.

४. तो त्याच्या शाळेतील शिक्षक, तसेच वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती यांना मान देतो आणि त्यांचा आदर करतो.

५. देवाची आवड

अ. देवकृष्णला सुटी असेल, तेव्हा तो सकाळी लवकर उठून देवपूजा करतो.

आ. तो प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, हे नामजप लिहितो.’

– सौ. दीप्ती विनय जगताप (कु. देवकृष्णची आई), बेंगळुरू, कर्नाटक. (१०.६.२०२४) (सर्व सूत्रांचा दिनांक : १०.६.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.