सेवेची आवड आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा डोंबिवली येथील कु. मंत्र मच्छिंद्रनाथ म्हात्रे (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मंत्र म्हात्रे हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. मंत्र मच्छिंद्रनाथ म्हात्रे याची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के आहे.’ – संकलक)

‘कार्तिक शुक्ल षष्ठी (७.११.२०२४) या दिवशी कु. मंत्र मच्छिंद्रनाथ म्हात्रे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मंत्र मच्छिंद्रनाथ म्हात्रे याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. मंत्र म्हात्रे

 

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. घरकामात साहाय्य करणे  

‘मंत्र मला घरकामात साहाय्य करतो. तो त्याच्या शाळेच्या सुटीच्या दिवशी दुकानातून भाजी आणि इतर साहित्य आणून देतो.

२. विचारण्याची वृत्ती

मंत्र इतरांना विचारल्याविना कोणताही खाऊ खात नाही. एकदा त्याच्या मोठ्या भावाने खाऊ आणला होता आणि मंत्रला तो खायचा होता. तेव्हा त्याचा भाऊ कार्यालयात गेला होता. तेव्हा मंत्रने भ्रमणभाष करून त्याच्या भावाला विचारले, ‘‘दादा, तू आणलेला खाऊ मी खाऊ का ?’’ दादाने अनुमती दिल्यावरच त्याने खाऊ खाल्ला.

सौ. दीपा म्हात्रे

३. प्रेमभाव

मंत्र इतरांची काळजी घेतो. घरात कुणाला काही झाल्यास मंत्र लगेच त्यांना साहाय्य करतो. काही मासांपूर्वी मला गालगुंड झाले होते. माझे गाल पुष्कळ सुजले होते. मला तापही आला होता. तेव्हा घरी मंत्र आणि मी दोघेच होतो. त्या कालावधीत त्याने माझी पुष्कळ सेवा केली. त्याने मला अत्तर, कापूर लावला. त्याने माझ्या कपाळावर मीठ-पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि माझ्या गालावर हात ठेवून दत्ताचा नामजप केला. तेव्हा माझा त्रास बर्‍याच प्रमाणात उणावला.

४. चुकांविषयी संवेदनशील

एकदा मंत्रने माझ्याकडे ‘चॉकलेट’ मागितले. तेव्हा मी त्याला ‘चॉकलेट देते’, असे सांगितले; पण नंतर मला समजले की, ‘ते चॉकलेट पुष्कळ महाग आहे.’ मी मंत्रला सांगितले, ‘‘आपण एवढे महाग चॉकलेट घ्यायचे नाही. आपण असा वायफळ व्यय करू नये. पैसे मिळवण्यासाठी पुष्कळ कष्ट करावे लागतात.’ तेव्हा त्याला माझा पुष्कळ राग आला. तो रात्री रागाने झोपला. तो माझ्याशी बोलला नाही. तो दुसर्‍या दिवशी सकाळी अंथरुणातून उठल्यावर लगेच माझ्याजवळ कान पकडून आला. त्याने माझी क्षमा मागितली. तो मला म्हणाला, ‘‘आई, मी असा हट्ट पुन्हा कधी करणार नाही.’’ तेव्हा मला पुष्कळ भरून आले.

५. सेवेची आवड

मे २०२३ मध्ये आम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे गेलो होतो. तेव्हा तिथे काही साधक अन्य साधक बसलेल्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडील खाऊची रिकामी झालेली पाकिटे जमा करण्याची सेवा करत होते. ते मंत्रने पाहिले आणि त्याला ‘ती सेवा करूया’, असे वाटले. तो लगेच सेवा करायला गेला. मला वाटले तो कुठेतरी खेळत असेल; पण तो साधकांकडे जाऊन खाऊची रिकामी झालेली पाकिटे जमा करण्याची सेवा करत होता. त्याला या सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला.

६. गुरुमाऊलींप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती) भाव

मंत्र एकदा शाळेत जिना उतरत असतांना जोरात पडणार होता; पण तो लगेच सावरला. तेव्हा त्याने गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तो घरी आल्यावर त्याने मला घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तो मला म्हणाला, ‘‘मी पडता पडता गुरुदेवांच्या कृपेमुळे वाचलो.’’

‘गुरुमाऊली, तुम्हीच माझ्याकडून या दैवी बालकाला घडवण्याची सेवा करून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. दीपा म्हात्रे (कु. मंत्रची आई), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे (१४.४.२०२४)