१. ध्यानमंदिरात बसून एकाग्रतेने नामजप करतांना दिसलेली दृश्ये
‘२०.७.२०२४ या दिवशी सायंकाळी मी देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. काही वेळाने माझे मन एकाग्र झाले. तेव्हा मला पुढील दृश्ये दिसली.
अ. ध्यानमंदिरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पादुकांवर सोनेरी प्रकाशाचे चक्र फिरत आहे. त्या प्रकाशात गुरुदेवांच्या पादुका चमकत आहेत.
आ. पादुकांच्या वरच्या बाजूस असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या सभोवती चंदेरी प्रकाशाचे चक्र फिरत आहे आणि त्या प्रकाशाने संपूर्ण ध्यानमंदिर उजळून निघाले आहे.
२. साधकाला दिसलेली दृश्ये त्याच दिवशी पौर्णिमा चालू झाली असल्यामुळे दिसल्याची वाणी छायाचित्रांमधून ऐकू आल्याने भाव जागृत होणे
ही दृश्ये पहात असतांना माझ्या मनात विचार आला, ‘गुरुपौर्णिमा उद्या आहे, तर आज ही दृश्ये मला कशी दिसली ?’ त्या वेळी त्या छायाचित्रांमधून मला ‘आज पौर्णिमा चालू झाली आहे’, अशी वाणी ऐकू आली. हे ऐकल्यावर माझ्या अंगावर रोमांच येऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. नंतर मी पंचांगात पाहिले असता, ‘२०.७.२०२४ या दिवशी सायंकाळी ६ वाजता पौर्णिमेस आरंभ होत असून २१.७.२०२४ दुपारी ३.४७ वाजता पौर्णिमेची समाप्ती होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
ही दिव्य अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |