पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
संसारी महान ईश्वर ।
सद्गुरूंचा अवतार ।। १ ।।
सर्वभावे शरण जावे ।
मोह मायेला जाणावे ।। २ ।।
सद्गुरूंच्या नौकेनं ।
घडे पैलतिरा जाणं ।। ३ ।।
नाही अन्य सोपं साधन ।
जन्म मरण चुकवणं ।। ४ ।।
ही संधी नर जन्मात ।
धोंडिबा म्हणे करा प्राप्त ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)