सकारात्मक, उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. विक्रम डोंगरे !

‘माझा भाऊ श्री. विक्रम डोंगरे याची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सकारात्मक आणि उत्साही

एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘सनातन प्रभात’ नियतकालिके ‘अपलोडींग’ (सनातन प्रभातमधील लिखाण संकेतस्थळावर ठेवणे) संबंधी शिबिर होते. विक्रमकडे या शिबिराचे दायित्व होते. त्या वेळी मला त्याच्या चेहर्‍यावर ताण किंवा काळजी जाणवली नाही. तो सतत सकारात्मक आणि उत्साही होता.

सौ. नेहा नागेश जोशी

२. मला त्याच्या चेहर्‍याकडे पाहून पुष्कळ चांगले वाटले.

३. सहजतेने वागणे

मला त्याच्या वागण्यात पुष्कळ सहजता जाणवली. मला त्याच्या वागण्यात अहं जाणवला नाही. तो सर्वांशी मिळून मिसळून बोलत होता.

४. कर्तेपणा नसल्याने सहजतेने आणि आनंदाने साहाय्य करणे

तो शिबिराच्या सेवेत व्यस्त असूनही माझ्या अडचणी सोडवण्यासाठी मला साहाय्य करत होता. तेव्हा त्याची कधीच चिडचिड झाली नाही. तो हसतमुखाने मला साहाय्य करत असे. त्याच्यातील कर्तेपणा न्यून झाल्याने तो इतक्या सहजतेने आणि आनंदाने साहाय्य करत होता.

५. सेवेची तळमळ

त्याने शिबिरात तळमळीने विषय मांडले. त्याच्यामधील तळमळीमुळे शिबिरातील साधकांमध्येही तळमळ वाढली. ‘त्याने देहभान विसरून आणि झोकून देऊन सेवा केली’, असे मला जाणवले. त्याच्या खोलीत रहाणार्‍या एका साधकाने मला सांगितले, ‘‘विक्रमदादा रात्री उशिरा खोलीत येतात आणि सकाळी लवकर उठून सेवा करायला जातात. त्यांना शारीरिक त्रास असतांनाही त्यांनी तळमळीने सेवा केली.’’

मला चांगला साधक भाऊ मिळाल्याबद्दल मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. नेहा नागेश जोशी (श्री. विक्रम यांची बहीण), पुणे (२९.७.२०२४)