सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधकांना मार्गदर्शन
सुश्री (कु.) राजश्री सखदेव : ‘साधकांचे सत्संग होत आहेत’, हे कळले, तेव्हा माझ्या मनात ‘मला अजून सत्संग मिळाला नाही’, असा विचार आला नाही. साधकांची भेट होत असल्याचा आनंद पुष्कळ होता; पण त्यात ‘माझी भेट व्हायला हवी, मला अजून बोलावले नाही’, असा विचार नव्हता.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : समष्टीच्या आनंदात स्वतःला आनंद मिळणे, हे महत्त्वाचे आहे. हा साधनेतील एक पुढचा टप्पा झाला. फारच छान !