प्रेमभाव आणि व्यष्टी साधनेची तळमळ असणारे केरळ येथील श्री. नीलेश बांदिवडेकर (वय ५० वर्षे) !

‘उद्या ३.११.२०२४ या दिवशी श्री. नीलेश बांदिवडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. नीलेश बांदिवडेकर

श्री. नीलेश बांदिवडेकर यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. प्रेमभाव

श्री. नीलेश बांदिवडेकरदादा त्याच्याकडील वस्तू सहजपणे इतरांना देतो. तो साधकांना आवडणारे पदार्थ आश्रमात घेऊन येतो. दादांनी त्याच्या रुग्णाईत आईची (श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांची) सेवा मनापासून केली. श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे निधन २६.१२.२०२१ या दिवशी झाले.

२. व्यष्टी साधनेची तळमळ 

फेब्रुवारी २०२४ मध्ये पू. रमानंदअण्णा (सनातन संस्थेचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा) यांचा केरळ राज्यात धर्मप्रचारार्थ दौरा होता. त्या वेळी पू. अण्णांनी नीलेशदादाला त्याच्या काही स्वभावदोषांची जाणीव करून दिली. नीलेशदादाने दुसर्‍या दिवसापासून त्यावर मनापासून प्रयत्न चालू केले. त्याने त्यासाठी प्रायश्चित्तही घेतले. आता दादामधे पालट जाणवतो.

३. त्याग 

दादाला आर्थिक अडचण असूनही तो सेवाकेंद्रासाठी वेळोवेळी साहाय्य करतो.

४. गुरूंप्रती भाव 

दादाचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. त्याच्या घरी तो एकटाच असतो; पण ‘आपल्या समवेत गुरुदेव आहेत’, अशी त्याची श्रद्धा आहे. काही मासांपूर्वी त्याला रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी त्याला थोडी भीती वाटली, तरी ‘गुरुदेव आहेत’, या विचाराने तो स्थिर होता.

गुरूंच्या कृपेने दादाचे गुण माझ्या लक्षात आले, त्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता आणि दादाची आध्यात्मिक प्रगती लवकर होऊ दे, अशी गुरुचरणी प्रार्थना !’

– कु. प्रणिता सुखठणकर, केरळ. (२३.९.२०२४)