नाम हाच भगवंताचा अवतार !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. ‘सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो’, असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. त्यावरून असे ठरते की, सुष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून त्यांत दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल, तर तो भगवंताच्या नामाचाच आहे आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणेच जरूर आहे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज